Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

करकंब दिनांक २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून श्री राम प्रतिष्ठान व रोटरी क्लब आँफ करकंब व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांच...

करकंब दिनांक २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून श्री राम प्रतिष्ठान व रोटरी क्लब आँफ करकंब व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 सुरुवातीला करकंब पत्रकार संघाचे अध्यक्ष शहाजीराव काळे.मनोज पवार,लक्ष्मण जाधव,गोपीनाथ देशमुख, राजेंद्र करपे,विश्वनाथ केमकर, ऋषीकेश वाघमारे, मेजर हणमंत कणसे पोलीस अधिकारी रघूनाथ जाधव साहेब बाळासाहेब शिंगटे,डॉ. प्रशांतकुमार मोरे.विजय भागवत,संजीवकुमार म्हेत्रे डॉ.विनोद शिंगटे पांडूरंग काटवटे,प्रमोद रेडे.विजय जाधव,अक्षय नगरकर,यांचे शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांनी विधायक कार्यास नक्कीच आमच सहकार्य राहणार असून शुभेच्छा दिल्या .पोलीस अधिकारी रघूनाथ जाधव साहेबांनी ही करकंब मधिल अनेक चांगल्या उपक्रमांना  नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतो,भविष्य काळातही अनेक नवनवीन संकल्पना राबवून करकंब नगरीच नाव उज्वल करायच आहे.नंतर रक्तदानास सुरुवात झाली.४५ रक्तदात्यांनी  रक्तदान करून सहकार्य केले.

सरपंच तेजमालाताई पांढरे व शरदचंद्र पांढरे यांनी भेट देऊन रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.सुनील दुधाणे यांनी  सूत्रसंचलन नंदलाल कपडेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमनं व रोटरीक्लबचे वरूण पुरवत,अक्षय मोरे,सुरेंद्र इदाते,गणेश पिसे,सिध्देश्वर रक्तपेढी अजय जाधव व  कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेतले.

.