Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

करकंब         करकंब येथील केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी(BLO) कर्मचारी यांच्या वतीने करकंब ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय मतदार दिवस सर्वाना ...

करकंब 

       करकंब येथील केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी(BLO) कर्मचारी यांच्या वतीने करकंब ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय मतदार दिवस सर्वाना मतदार नोंदणी करण्याचे प्रतिज्ञा देवून साजरा करण्यात आले.




        करकंब बी.एल.ओ.सुपरवायझर बोरे सर यांच्या मार्गदर्शनातून,बीएलओ एम.के.पुजारी यांच्या नियोजनाने करकंब ग्रामपंचायत उपसरपंच आदिनाथ देशमुख  यांच्या उपस्थितीत  मतदार जागृती अभियान व प्रतिज्ञा वाचन करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आले.  


   यावेळी प्रतिज्ञा वाचन बीएलओ अविनाश देवकते यांनी केले.या कार्यक्रमास करकंब ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे,पत्रकार शहाजी काळे,करकंब केंद्रप्रमुख अप्पासाहेब माळी,बी.एल.ओ.शंकर गायकवाड,बीएलओ नागन्नाथ घाटुळे,बीएलओ गहिनीनाथ व्यवहारे, बीएलओ महादेव पुजारी,परमेश्वर धोत्रे,भागवत पलंगे,विशाल देशमुख,बाबर नाना, ग्रामपंचायत कर्मचारी  व ग्रामस्थ उपस्थित होते.


     रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यू काॅलेज करकंब येथेही राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्राचार्य हेमंत कदम यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा वाचन  करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.