Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

DAV रामभाऊ जोशी हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम ; वह्या वाटपाने "पारावरील शाळेची" सांगता....

करकंब:- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रकानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा...


करकंब:-

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रकानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करण्यासाठी,

     दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर येथील उपक्रमशील स्काऊट शिक्षक एम.के.पुजारी यांच्या नियोजनाने शिक्षक आपल्या दारी उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमांमुळे गावातील मंदिरे झाली शैक्षणिक मार्गदर्शनाची शाळा, करकंब गावातील मोठ्या ऐतिहासिक मंदिरामध्ये त्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी "पारावरील शाळा" भरवण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दररोज उपस्थित राहत होते.

स्मार्ट फोन नसलेल्या पालकांच्या पाल्यासाठी,अध्ययन अक्षमता असणा-या विद्यार्थ्यांसाठी,भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने या तासाचा उपयोग झाला.

       करकंब येथे पारावरील शाळेची सुरूवात संत सावता माळी मंदिर, शुक्रवार पेठ येथून करण्यात आले. विठ्ठल मंदिर टिळक चौक,शंभू महादेव मंदीर व्यवहारे गल्ली,काळा मारूती मंदीर सोमवार पेठ, आणि सोमवारपासून शाळा सुरू होत असल्यामुळे सांगता समारंभ हजरत पीर मगदुम बाबा दर्गा येथे करण्यात आले.


    यावेळी या पारावरील शाळेत उपस्थित असणा-या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,अतुल अभंगराव,महादेव पुजारी,संजय पंचवाडकर यांच्या वतीने उपस्थित पालकांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वहया पेन वाटप करण्यात आले.

या उपक्रमास मंदीर समिती चे विश्वस्त हभप कांतीलाल खारे महाराज ,हभप श्रीकांत आरोळे महाराज, विविध पालक,सदस्य संतोष धोत्रे उपस्थित राहून मार्गदर्शन व आनंद व्यक्त केले.

      उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे स्काऊट शिक्षक महादेव पुजारी, जेष्ठ शिक्षक नरसिंग एबोते,संगीत शिक्षक संजय पंचवाडकर,शकुर बागवान, सेवक सुभाष चौगुले, यानी विषेश परीश्रम घेतले.

        या सर्व शिक्षकांचे प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,संस्थेचे सचिव महेशजी चोप्राजी यांनी अभिनंदन व कौतुक केले.