Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प.प्रा.शाळा मुले क्र 2 करकंब येथे बालिका दिन व वाचन अभियान उत्साहात संपन्न

 आज दिनांक 3 जानेवारी 2022 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 2 करकंब, ता.पंढरपूर, जि.सोलापूर येथे भारतीय महिला शिक्षणाच्या जननी, आद्य क्र...

 आज दिनांक 3 जानेवारी 2022 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 2 करकंब, ता.पंढरपूर, जि.सोलापूर येथे भारतीय महिला शिक्षणाच्या जननी, आद्य क्रांतिकारी महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती.अनिता गोविंद वेळापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

            शाळेच्या आदर्श शिक्षिका सौ.चंद्रकला दत्तात्रय खंदारे मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या महिलांचे शिक्षण या मौल्यवान कार्याची माहिती आणि ते कार्य करत असताना आलेल्या अनेक संकटाविषयी माहिती मुलांना सांगितली. तसेच घरातील एक महिला शिकली तर त्या संपूर्ण कुटुंबाचे व घराचे कल्याण होते. हे सावित्रीबाईंनी आख्या जगाला दाखवून दिले.त्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक महिलांना शिक्षणाचा अधिकार दिलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.

      राज्य शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे कोरोना काळात वाचनाबाबत कमी झालेली आवड पुनःश्च आवड निर्माण करण्यासाठी 100 दिवसांचे वाचन अभियान राबविन्याबाबत सांगितले आहे. शाळेतील आदर्श शिक्षक श्री.रविकिरण भास्कर वेळापूरकर सर यांनी सदर अभियानाची माहिती सांगून त्याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांचे वाचन घेतले.

   शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री.बालाजी माणिकराव मुदगडे सर यांनी 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाची माहिती सांगून आपल्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार किती महत्त्वाचे आहे त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.