Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे झाला सावित्री मातांचा गौरव; कविता आणि हास्यकल्लोळात न्हाले श्रोते

प्रतिनिधी। करकंब  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोज...


प्रतिनिधी। करकंब 

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

  यावेळी कनकंबा दूध डेअरीचे चेअरमन व स्व. दत्ता खारे चेअरमन प्रतिष्ठानचे सतिश खारे अरुण बनकर, बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते गणेश उत्तरेश्वर गुळमे, माजी शिक्षणाधिकारी सुजाता लोहकरे, दीपाली म्हेत्रे, वंदना म्हेत्रे,  मुख्याध्यापिका संगीता करमाळकर, ग्रा. पं सदस्य बापू शिंदे, रेखा गायकवाड, दिलकेशा बागवान, संजीवकुमार म्हेत्रे,  हास्य कलाकार मोहन शिंदे, कवी लक्ष्मण जाधव, अविनाश देवकते, प्रा. किसन सलगर,नितीन खाडे, राजेंद्र करपे, लक्ष्मण शिंदे, प्रदीप खंकाळ,  ॠषीकेश वाघमारे, पो. काॅ. हरिहर, गावडे, विद्या सलगर, सुवर्णा स्वामी, शितल गायकवाड   इत्यादी सह हिरकणी पुरस्कार प्राप्त महिला , शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना सुजाता लोकरे म्हणाल्या, ' आपली मुलं ही सुसंस्कृत घडविण्याची मोठी जबाबदारी ही आईची असते. वडीलांपेक्षा ती जास्त जवळीच वाटते. मुलांनीही समाजभान ठेवून आपले भावी जीवन उज्वल केले पाहिजे.'

  


यावेळी संगीता करमाळकर, वेदीका टकले, कु. लोंढे ,लक्ष्मण जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली.

• हास्य कलाकार मोहन शिंदे यांनी आपली कला, कविता, विनोद सांगून श्रोत्यांना मनसोक्त हसविले.  तर कवी लक्ष्मण जाधव यांनी 'शेवंतीची फूले' ही आई वरील कविता सादर केली. तसेच सुजाता लोहकरे यांनीही आपली कविता सादर केली.••


• न्यू इंग्लिश स्कूल  व कनकंबा ग्रुप यांच्या वतीने कर्तृत्वाने महिलांना  सावित्रीमाई 'हिरकणी' पुरस्काराने सन्मानित महिला करण्यात आले. त्या महिला..:-


•सौ. मीनाक्षी अंकुश वावरे

• सौ. मंगल रघुनाथ भोसले

•सौ. वंदना भारत शिंदे 

•सौ. सुलभा अशोक दुधाणे 

•सौ. महानंदा मोहन शिंदे 

•सौ. मंगल महादेव सलगर 

•सौ. उर्मिला गणेश गुळमे

•श्रीमती प्रितम कुमार दुधाणे 

•स्व. सौ. शेवंताबाई मारुती जाधव 


•यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचाही सन्मान करण्यात आला. 

यासाठी संजीवकुमार म्हेत्रे,  सुनिल मेहरकर, महादेव माळी, महादेव चव्हाण, मोहनसिंग रजपूत, अशोक खपाले, शंकर गायकवाड, प्रशांत वेळापूरकर, लऊळकर, रमेश म्हेत्रे, विजय म्हेत्रे, जयंत सोमण, योगेश गायकवाड, उंबरजे, जमखंडे,मोहन बोधे,  सपना नाखील, लक्ष्मी शिंदे इत्यादीनी सहकार्य केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव चव्हाण यांनी तर आभार शंकर गायकवाड यांनी मानले.