Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

मोहन बोधे यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार सोहळा संपन्न

करकंब न्यू इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेत ३६ वर्षे नाईक या पदावर काम करून ते सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने करकंबकर ग्रामस्थ व कुटुंबाच्य...

करकंब न्यू इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेत ३६ वर्षे नाईक या पदावर काम करून ते सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने करकंबकर ग्रामस्थ व कुटुंबाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.सुरुवातीला मोहन बोधे कुमारदादा टकले,प्रभाकर टेके,मिलिंद उकरंडे,विजय भागवत,सुनिल दुधाणे, प्रभाकर रसाळ,दत्तात्रय बोधे,ज्ञानेश्वर दुधाणे यांचे उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. नंतर कुटुंबातील व्यक्तिंनी ६१दिव्यांनी औक्षण करुन समस्त ग्रामस्थांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गरीब परिस्थिती असल्या मुळे शिकता आले नाही. पण थोड्याच शिक्षणावर शिपाई म्हणून प्रामाणिक नोकरी करत मुलांना मात्र कष्ट करुन शिकवले.याचे समाधान वाटते.

मनोगत व सत्कारानंतर ख्यातनाम गायक अभिषेक काळे यांची मैफिल झाली.यामध्ये त्यांनी अनेक सुंदर बंदीश तराणा ,नाट्यगीत, भावगीत, अभंग गाऊन करकंब करांना मंत्रमुग्ध करत त्यांना तेवढीच सुंदरसाथ ओंकार पाठक, ज्ञानेश्वर खरात,ज्ञानेश्वर दुधाणे,ज्ञानेश्वर पिसे,यांनी केली. 

यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सेवानिवृत्ती चा सुंदर कार्यक्रम करकंबकर यांनी अनुभवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप तारळकर.वरवडे.प्रियांका वरवडे,योगीता तारळकर, विशाल बोधे, वृषाली बोधे,यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक योगीता तारळकर यांनी केले.आभार विजय भागवत यांनी मानले.Advertisement