Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी नवनाथ पोरे तर कार्याध्यक्षपदी सुनिल उंबरे उपाध्यक्षपदी महालिंग दुधाळे, सचिन शिंदे तर सविचवपदी गणेश गायकवाड यांची निवड

। पंढरपूर, प्रतिनिधी श्रमिक पत्रकार  संघ पंढरपूर या संघाच्या नुतन वर्षा करीता नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहिर  झाला. अध्यक्षपदी नवनाथ...


। पंढरपूर, प्रतिनिधी

श्रमिक पत्रकार  संघ पंढरपूर या संघाच्या नुतन वर्षा करीता नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहिर  झाला. अध्यक्षपदी नवनाथ पोरे, कार्याध्यक्षपदी सुनिल उंबरे , उपाध्यक्षपदी महालिंग दुधाळे, सचिन शिंदे तर सचिवपदी गणेश गायकवाड तसेच खजिनदारपदी सतिश बागल यांची निवड करण्यात आली.

श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या नुतन पदाधिकारी निवडीची बैठक सोमवार दि. 3 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वा. पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुर्यकांत बनकर सर  होते.

या बैठकीच्यावेळी वरील नवीन पदाधिकार्‍यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन निवडी होताच जेष्ठ मार्गदर्श सिध्दार्थ ढवळे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीच्यावेळी  6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमबाबत चर्चा करण्यात आली. या संघामध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या नवीन पत्रकारांचेही स्वागत करण्यात आले. वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजनही या बैठकीमध्ये घेण्यात आले.


या बैठकीसाठी श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे जेष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे, माजी अध्यक्ष मोहन डावरे, बजरंग नागणे, सुधाकर कवडे, अविनाश साळुंखे, उत्तम बागल, भिमा व्यवहारे, सचिन कांबळे, समाधान गायकवाड, समाधान काळे सर, सुनिल कोरके, मोहन काळे, अतुल अभंगराव, अरूण बाबर, सावता जाधव, शहाजी काळे, मोहोन कोळी, आण्णा पवार, बालाजी चव्हाण आदी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.