Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प. प्राथ. शाळा मुली नं १ शाळेत बालिका दिन व नुतन शाळा व्यवस्थापन समिताचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

करकंब : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करकंब मुली नं १ शाळेत मुलींच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या ह...

करकंब : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करकंब मुली नं १ शाळेत मुलींच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

 त्यामध्ये रांगोळी, चमचालिंबू,संगीतखुर्ची,आदी त्यामध्ये क्रमांक मिळवलेल्या मुलींना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या विषयी तसेच अनेक थोर समाजकारकांच्या वेशभूषा तयार करून अनेक मुलींनी भाषण केली.

त्यानंतर मुली नं १ शाळेत नुतन शाळा व्यवस्थापन समिती त्यामध्ये नुतन अध्यक्षा सौ. सविता तानाजी काशिद,उपाध्यक्षा सौ. डॉ. संध्या प्रदीप देशमुख,संध्या शेटे,मिनाक्षी रेपाळ,अमृता रसाळ,संचिता बंडगर,सर्व सदस्य माजी अध्यक्षा साधना काळे यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला.यावेळी या सर्व कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन कु. स्वरा रेपाळ या विद्यार्थीनींन केल.यावेळी शाळेतील मुलींच्या सर्व माता उपस्थित होत्या.

यावेळी करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख. आप्पासाहेब माळी,मुख्याध्यापिका उषा कांबळे, सहशिक्षिका देवकी कलढोणे, रेखा कांबळे,व सर्व मुलींनी कार्यक्रम यशस्वी केला.