Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

वसुंधरा पर्यावरण मंडळ(RJHSK)करकंब आम्ही किल्लेदार..... शिवकालीन किल्ला बांधणी स्पर्धा बक्षिस वितरण संपन्न

करकंब:- रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या "वसुंधरा पर्यावरण मंडळ" करकंब च्या वतीने आयोजित ईको फ्रेंडली (पर्...

करकंब:- रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या "वसुंधरा पर्यावरण मंडळ" करकंब च्या वतीने आयोजित ईको फ्रेंडली (पर्यावरण पुरक)गड किल्ले बाधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाने इ.5वी ते 10वी विद्यार्थ्यांनांसाठी पर्यावरण पुरक किल्ले बांधणी("आम्ही किल्लेदार") स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या मागे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याबरोबरच रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्यांच्या बळावर बलाढ्य शत्रूला नामोहरम केले त्या गड किल्ल्यांची ओळख भावीपिढीला व्हावी,आपल्या शुरवीरांच्या पराक्रमांची महती ज्ञात व्हावी हा देखील उद्देश या गड किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आले.

    या गड किल्ले बांधणी स्पर्धेत भरपूर स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सर्व सहभागी स्पर्धकांनी पाठवलेल्या किल्ल्यांच्या फोटोचे परीक्षण श्री.दत्तात्रय खंदारे,श्री.सागर थिटे,श्री.नंदकुमार कुंभार यांनी उत्कृष्ट परीक्षण करून विजेते विद्यार्थी ठरविले.

1) देवराज दत्तात्रय पवार 8वी प्रथम क्रमांक

2) विशाल रमेश वसेकर 9वी द्वितीय क्रमांक 

3) रोहन अशोक कुंभार  9वी तृतीय क्रमांक

4) समर्थ अभिजित टेके 6वी उत्तेजनार्थ

 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना करकंब पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. निलेश तारू साहेब यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल,शैक्षणिक साहित्य देवून गौरव करण्यात आले. यावेळी परीक्षक दत्तात्रय खंदारे, प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,पोलीस नाईक झाडकर साहेब,पत्रकार अतुल अभंगराव,पत्रकार लक्ष्मण शिंदे,मंडळाचे समन्वयक एम.के.पुजारी यांच्या उपस्थितीत गौरव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.