Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

धाडस सामाजिक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह मध्ये धाडस संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. या प्रसंगी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्य...

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह मध्ये धाडस संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या.


या प्रसंगी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष पंढरपूर विभाग विजय माळी,पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष विजयकुमार नलवडे, दक्षिण तालुका अध्यक्ष हुवाणा शेजाळे, लैला मुबारक सोलापूर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष, अनिता कुंभार पिंपरी चिंचवड पुणे विभाग अध्यक्ष, इक्बाल मुलाणी माळशिरस तालुका युवक अध्यक्ष, सुहास कोळी उत्तर सोलापूर सोशल मीडिया युवक तालुकाध्यक्ष, वरील निवडी धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी धाडस सामाजिक संघटना महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष शितलताई खटावकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष धनाजी बनसोडे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नानासो केसकर, वंदनाताई पंत,  सीमाताई प्रक्षाळे, संजय धोत्रे, शशिकांत गायकवाड, अमोल कुबेर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.