Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

उंबरे केंद्रशाळेत विद्यार्थी मित्रांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

कोरोनामुळे तब्बल वीस महिने बंद असलेली शाळा शासनाच्या आदेशानुसार आज पासून सुरू झाली. कोरोनाविषयक जनजागृतीपर बँनर झळकावत, घोषणा देत सर्व विद्य...

कोरोनामुळे तब्बल वीस महिने बंद असलेली शाळा शासनाच्या आदेशानुसार आज पासून सुरू झाली.

कोरोनाविषयक जनजागृतीपर बँनर झळकावत, घोषणा देत सर्व विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.फुलांची उधळण करून, मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी,फुले व फुग्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.आकर्षक फलकलेखन करण्यात आले होते.

अनेक दिवसांपासून मुकेपणा अनुभवत असलेले,शाळेचे भव्य प्रांगण चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.विद्यार्थी पालकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.

पालकांचे संमतीपत्र घेणे,शाळेची वेळ याबाबत चर्चा करून मुलांना आरोग्य विषयक सुचना देण्यात आल्या.

यावेळी ज्ञानदेव भाऊ ढोबळे,सरपंच प्रतिनिधी महादेव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर इंगळे,ग्रामसेवक पांढरे भाऊसाहेब,डॉक्टर काझी, ग्रा.पं.सदस्य विलास सलगर, अनिरुद्ध काका मुजमुले,धनाजी ढोबळे,विजय गुजर,प्रकाश कांबळे, हरिदास मुजमुले, हरिदास पाटील, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कोरोनाविषयक आवश्यक सर्व काळजी घेण्यात आली.