Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये आजपासून किलबिलाट सुरू इ. १ पासून ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा उत्साहात सुरू

आज करकंब केंद्रातील सर्व  जि. प. शाळा व खाजगी अनुदानित व इंग्लिश मेडीयम माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवी शाळा कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधी न...



आज करकंब केंद्रातील सर्व  जि. प. शाळा व खाजगी अनुदानित व इंग्लिश मेडीयम माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवी शाळा कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर चालू झाल्या व केंद्रातील शाळेच्या पहिल्या दिवसा चे औचित्य साधून सर्व मुलां मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

आज सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सोव अतिशय उत्साहात संपन्न झाला.

यावेळी "माझी वसुंधरा अभियान" याविषयी प्रतिज्ञा घेतली. कोरोना नंतर शाळा पहिल्यांदा प्रत्यक्ष भरत असल्याने मुले व मुली  अतिशय आनंदात होते. यावेळी मुलींना फुगे देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी मुलांना व मुलींनी शाळेत कोरोना नियमांचे पालन करून नियमित उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्रातील आजची विद्यार्थी सरासरी उपस्थिती 75%  होती. सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. आनंदाच्या वातावरणात व कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या. शाळांमध्ये आनंदाचे वातावरण व बालगोपाळांचा किलबिलाट होता. 

कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे असे आवाहन केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी यांनी केले.