Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अंजली नंदिनी गायकवाड आर्या आंबेकर यांच्या अनुसंध्या सुर अभंगाने मंगळवेढेकर मंत्रमुग्ध

स्व.सौ.अनुराधा लक्ष्मणराव ढोबळे यांच्या जयंती निमित्ताने मंगळवेढा येथे सुप्रसिद्ध गायिका इंडियन आयडीअल फेम अंजली नंदिनी गायकवाड व लिटील चँम्...

स्व.सौ.अनुराधा लक्ष्मणराव ढोबळे यांच्या जयंती निमित्ताने मंगळवेढा येथे सुप्रसिद्ध गायिका इंडियन आयडीअल फेम अंजली नंदिनी गायकवाड व लिटील चँम्प अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा अनुसंध्या सुर अभंगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातील शाहु परिवाराचे सर्वेसर्वा माजी पालकमंत्री  मा. श्री. लक्ष्मणराव ढोबळे,चेअरमन अभिजित ढोबळे,सावली फाउंडेशन अध्यक्षा कोमल साळुंखे, उद्योजक अजय साळुंखे नगराध्यक्षा अरुणा माळी,रमेश जोशी, शरद शिर्के,अजीत जगताप,सुजीत कदम,आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला अंजली नंदिनी च्या सुमधुर स्वरांनी सुर निरागस हो गणपती या गणेशवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करुन मन मंदिरा,आवडे हे रुप,कानडा राजा पंढरीचा.विष्णूमय जग,दही दुध लोणी,वृंदावनी वेणू,कसली जीवाला भुल पडे आदी सुंदर अभंगरचना गाऊन मंगळवेढेकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.

त्यांना तेवढीच सुंदर साथसंगत वडील व गुरु हार्मोनियम अंगद गायकवाड तबला दत्तात्रय कचरे पखावज ज्ञानेश्वर दुधाणे. टाळ विश्वास बागडे यांनी केली.मध्यांतरात मा लक्ष्मणराव ढोबळे यांचा आरोग्य शिबिर, व अनुसंध्या सुर अभंगाचे औचित्य साधून मंगळवेढा तमाम जनतेच्या व शाहु परिवाराच्या वतीनं क्रेननं हार घालुन जंगी सत्कार करण्यात आला. 

त्यानंतर आर्या आंबेकर यांचा कार्यक्रम सुरु होऊन त्यांनी भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा,पद्मनाभा नारायणा,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, मालिकांचे टायटल साँग व शेवटी अवघा रंग एक झाला भैरवी गाऊन सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला मंगळवेढा रसिक व महाराष्ट्रातून अनेक शाहु परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.