Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शालेय मुलामुलींनी भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी सावध पाऊल उचलणे गरजेचे-सपोनि निलेश तारु

करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये मुलांना मार्गदर्शन करताना सपोनि निलेश तारू,प्राचार्या विजया उंडे, कैलास हरिहर, आर आर जाधव, ...


करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये मुलांना मार्गदर्शन करताना सपोनि निलेश तारू,प्राचार्या विजया उंडे, कैलास हरिहर, आर आर जाधव, उमेश जाडकर व विद्यार्थी

करकंब:

१४ते १८वयोगटातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली जाते त्यामुळे मुलींनी भविष्यातील आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तारुण्यातील प्रत्येक पाऊल जपून टाकावे असे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे स.पो.नि. निलेश तारू यांनी केले.

करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनियर कॉलेज येथे किशोरवयीन मुला-मुलींनी करियर व तारुण्यातील जबाबदारी ओळखून स्पर्धा परीक्षा तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याच्या बाबतीत  भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी सावध पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत सपोनि निलेश तारू यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या विजया उंडे ह्या होत्या.यावेळी पो.ह. कैलास  हरिहर , पो.ह. उमेश जाडकर, पो.ना. आर. आर. जाधव,  भीमा व्यवहारे, प्रा. राहुल कवडे, प्रा. आशिष काळे , प्रा. हरीश दिवटे, प्रा. भाग्यश्री स्वामी, प्रा. दत्तात्रय जुंदळे, अंकित वनखंडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पो.ह. उमेश जाडकर यांनी गुन्हे व कायद्या विषयी मार्गदर्शन केले. स.पो.नि. निलेश तारू यांनी करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शाळांना भेटी देऊन मुला-मुलींना फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रसंचालन प्रा. बापूराव खांडेकर यांनी केले तर आभार प्रा. नंदकुमार नाईकनवरे यांनी मानले.