Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पंढरपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षणाला मा.शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट

सोलापूर जिल्हा परिषद मा.मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीट स्वामी.व शिक्षणाधिकारी किरण लोहार साहेब यांचे संकल्पनेतून जिल्हास्तरीय गीतमंच प्रशिक्षण...

सोलापूर जिल्हा परिषद मा.मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीट स्वामी.व शिक्षणाधिकारी किरण लोहार साहेब यांचे संकल्पनेतून जिल्हास्तरीय गीतमंच प्रशिक्षणानंतर प्रत्येक तालुकास्तरावर या गीतमंचाच प्रशिक्षण दिनांक २३नोव्हेंबर ते २६नोव्हेंबर रोजी पंढरपूर तालुकास्तरीय प्रशिक्षण आदर्श प्रशाला येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मा.शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रशिक्षणास भेट दिली त्यावेळी त्यांनी मनोगतात सांगितले की आपण शिकलेली व गायलेली सर्व गाणी विद्यार्थ्यांच्या गळी उतरवा व पुढील काळात शाळा सुरू होतील त्यावेळी आनंददायी वातावरण निर्मिती करुन शाळेची ओढ लावा.तसेच कोरोना काळात अनेक अडचणींना सामोर जाव लागल आता शाळा सुरु होतील तेंव्हा या प्रशिक्षणाचा माध्यमातून मुलांच्या गुणवत्तेसाठी व आलेली पठारावस्था दुर करण्यासाठी निश्चित उपयोग होईल,मुलांना अर्थपूर्ण कविता.स्काँलरशिप स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन,सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक शिक्षिकांनी आई वडीलांच्या भुमिकेतून मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे.यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी चार दिवसात शिकवलेली गाणी त्यामध्ये पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया,सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभो,लाटावर लाटा सागराच्या लाटा आदी समूहगीत गायली.त्यावेळी लोहार साहेबांनी सर्वांच कौतुक केल.व स्वतः आकाशी झेप घेरे पाखरा हे गाण गाऊन गीतमंचातील शिक्षकशिक्षकांना प्रेरणा दिली.

यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. महारुद्र नाळे यांचेहस्ते किरण लोहार साहेबव उपशिक्षणाधिकारी जावीर साहेब,ॲड. आराध्ये,यांचा सत्कार करण्यात आला.या प्रशिक्षणाचे प्रमुख श्री हणमंत भोसले सर.विस्ताराधिकारी  चंद्रकांत खुळे साहेब तज्ञ मार्गदर्शक श्री प्रसाद कुलकर्णी,ज्ञानेश्वर दुधाणे ,एकनाथ कुंभार,देवानंद चव्हाण,शांताराम गाजरे,अनिता माने,राणी शंकर,वैशाली साळुंखे, यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी शिक्षक समिती.नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांचे हस्ते शिक्षणाधिकारी साहेबांचा विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सुनिल कोरे यांनी मनोगत व्यक्त केले.पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून तीन असे ७० शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.सुत्रसंचलन मारुती क्षीरसागर, यांनी केले सुनील अडगळे यांनी आभार मानले.