Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशालेमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा..

पंढरपूर: पंढरपूर येथील विद्या विकास मंडळ संचलित आपटे उपलप प्रशालेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रशालेच्या  सर्व महिला शिक्षिकांच्या ...

पंढरपूर:

पंढरपूर येथील विद्या विकास मंडळ संचलित आपटे उपलप प्रशालेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.

प्रशालेच्या  सर्व महिला शिक्षिकांच्या  हस्ते भारत देशाला संविधान बहाल करणारे,  विश्वरत्न, ज्ञानपंडीत, संविधान निर्माते, राज्य घटनाकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे चे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे सहशिक्षक श्री. सागर थिटे  सर यांनी सामुहिक संविधान उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन करून घेतले.

प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अनिल अभंगराव सरांनी ' भारतीय संविधान व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.