Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

DAV करकंब येथे संविधान दिन उत्साहात साजरा

  करकंब प्रतिनिधी... DAV शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित करकंब येथील  रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅल...

 


करकंब प्रतिनिधी...

DAV शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित करकंब येथील  रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅलेज करकंब येथे २६नोव्हेंबर "भारतीय संविधान दिन" साजरा करण्यात आला.


     प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे यांच्या हस्ते भारत देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न,ज्ञानपंडीत, संविधान निर्माते - राज्य घटनाकार,महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पूजन करण्यात आले.

       यावेळी मुख्याध्यापक हेमंत कदम  यांनी सामूहिक संविधान उद्देशपत्रिकाचे सामुदायिक  वाचन करून घेतले.

     स्काऊट शिक्षक एम.के. पुजारी यांनी "भारतीय संविधान व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर"या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी चे सहकार्य लाभले‌.