Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांच्या वतीने करकंब येथे गरजूंसाठी मार्गदर्शनपर शिबिर संपन्न.

  करकंब प्रतिनिधी  - पुणे येथील सेवावर्धिनी त्या संस्थेच्या मार्फत ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो टेक्नॉलॉजी च्या वतीने ज्या तरुणांना काम नाही...

 


करकंब प्रतिनिधी  - पुणे येथील सेवावर्धिनी त्या संस्थेच्या मार्फत ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो टेक्नॉलॉजी च्या वतीने ज्या तरुणांना काम नाही अशा  गरजू तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करकंब येथे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री सोमनाथ जी कुलकर्णी सर यांनी या संस्थेच्या वतीने  प्लंबिंग च्या कोर्समध्ये सौर ऊर्जा पाईप, गॅस पाईप ,इरिगेशन ड्रीप पाईप साठीचे प्रशिक्षण दिले जात असुन यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी करकंब व पंचक्रोशीतील ज्या तरुणांना काम नाही अशा तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या कोर्समध्ये सहभागी व्हावे  असे  आवाहन सोमनाथजी कुलकर्णी यांनी केले.

 तसेच त्यांनी दोन महिन्याच्या या निवासी प्लंबिंग च्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना त्या कोर्सची संबंधित सर्व माहिती देऊन त्यांच्याकडून प्रत्यक्षात प्लंबिंग ची कामे करून घेऊन त्यांना घडवले जाते व दोन महिन्यानंतर या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाते व या सर्टिफिकेट च्या आधारे या तरुणांना भविष्यामध्ये महानगरपालिका मध्ये प्लंबिंग ची कामे घेता येतात तसेच मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळू शकतात असेही त्यांनी सांगितले .

प्लंबिंग हा व्यवसाय तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी स्वच्छ असा सुरेख व्यवसाय असून तरुणांमधील आचार विचार व संस्कार यांची सांगड घालून या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तरुणांना घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्था प्रमाणिक पणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी पत्रकार सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते रमेश खारे, सतीश सोनकांबळे ,नामदेव सुरवसे, विकास काटवटे, हरी काटवटे, अजय जाधव ,अजय नगरकर, पांडुरंग व्यवहारे  व अन्य मंडळी उपस्थित होते.