Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशाला येथे श्रीमद् भगवद्गीता जयंती संपन्न

  योगेशम् सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरङ् कृष्णं वंदे जगद्‍गुरूम्!! जगद्गुरू भगवान विष्णु श्री कृष्ण यांच्या पावन मुखातू...

 


योगेशम् सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरङ् कृष्णं वंदे जगद्‍गुरूम्!!

जगद्गुरू भगवान विष्णु श्री कृष्ण यांच्या पावन मुखातून आलेल्या भगवद्गीता या तत्त्वज्ञान रूपी ग्रंथाची आज जयंती आपटे प्रशाला पंढरपूर या ठिकाणी साजरी करण्यात आली. 


यावेळी श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. जयंत हरिदास सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवद्गीतेची प्रार्थना इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी म्हटली यानंतर संस्कृत शिक्षक श्री गिरीश खिस्ते सर यांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच इयत्ता आठवीतील जया आठवले व रिद्धी, सिद्धी हरिदास यांनी भगवद्गीतेतील बारावा पंधरावा अध्यायातील प्रातिनिधिक स्वरूपात पाच श्लोक म्हटले. 


या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अभंगराव सर, श्री. चांडोले सर ,श्री. एन. पी. डांगे सर, श्री आदमिले सर, श्री. खरात सर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रतिमेस वंदन करून गीता जयंती साजरी केली.