Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील ७५ झाडांच वृक्षारोपण पूर्ण

करकंब आज रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.करकंब पत्रकार संघ,करकंब पोलीस करकंब पोलीस स्टेशन,व लेकीच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आ...



करकंब आज रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.करकंब पत्रकार संघ,करकंब पोलीस करकंब पोलीस स्टेशन,व लेकीच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी मा.श्री.ए.पी.आय निलेश तारु.व मा.श्री.मुंढे साहेब पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत बनकर. करकंब अध्यक्ष भिमा व्यवहारे सर,लक्ष्मण जाधव,सचिन शिंदे,गोपीनाथ देशमुख, राजेंद्र करपे,मनोज पवार,लक्ष्मण शिंदे,शहाजी काळे,व गावची लेक  डॉ. चैताली रसाळ लेकीचं झाड संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे.व टीम यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निलेश तारु म्हणालेलेकी झाड अभियान गावासाठी सुंदर उपक्रम असून या अभियानात भावनिक नाते निर्माण होऊन लेकीना जोडल गेल असल्याने आनंद वाटला जशी ही झाडं लावलीत तशी ही जोपासली जातील असा विश्वास तरुणांचा उत्साह पाहून वाटतो.मुंढे साहेबांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार सुर्यकांत बनकर यांनी सांगितले हा गावास या अभियानाचा खुप फायदा होणार असून ही झाडं टिकवण्यासाठी सर्व करकंब करांनी साथ दिली पाहिजे.पुढील काही वर्षात ही झाडं करकंब गावची शोभा ठरणार आहेत. आयुष्यभर 'लेकीच झाड' त्यांच्या रूपातून कायम आठवणीत राहणार आहे.तसेच लेक डॉ. चैताली रसाळ यांना हा उपक्रम खुप आवडला.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने जर पर्यावरण पूरक उपक्रमामुळे सगळ्या गावात राबवला तर खुप फायदा भविष्यात होणार आहे. यावेळी लेकीचं झाड टीम मधील ज्ञानेश्वर  दुधाणे,पांडुरंग काटवटे,नंदलाल कपडेकर, हरिश्चंद्र वास्ते,अक्षय नगरकर,विजय जाधव,गणेश पिसे,प्रमोद रेडे,विजय दुधाणे, आत्माराम चवरे आदी तरूणांनी अधिक परिश्रम घेतले,पुढील काळात झाडांसाठी कायपण घोषणा देऊन सर्वांचा उत्साह वाढवला.

चला आपण सर्व जण या अभियानात सामील होऊयात.