Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पं. हरिशजी तिवारी यांच्या गायनान दिली पं. भिमसेनजींच्या स्वरांची अनुभूती भिमसेनी आवाजात पं. हरीश तिवारी यांनी पंढरपूरकर रसिकांना केले मंत्रमुग्ध पं हरीशजी तिवारी यांच्या मेहनती स्वरांची पंढरपूरकरांना मेजवानी

फोटोओळ:-पं हरीशजी तिवारी यांच गायन साथसंगत महेश देसाई, (तबला) ज्ञानेश्वर दुधाणे पखवाज, ज्ञानेश्वर सोनवणे हार्मोनियम, धनंजय मनमाडकर टाळ,वैभव ...

फोटोओळ:-पं हरीशजी तिवारी यांच गायन साथसंगत महेश देसाई, (तबला) ज्ञानेश्वर दुधाणे पखवाज, ज्ञानेश्वर सोनवणे हार्मोनियम, धनंजय मनमाडकर टाळ,वैभव केंगार व राजेश खिस्ते तानपूरा

पंढरपूर प्रतिनिधी:-दत्त उपासक कै नारायण पंढरीनाथ दुधाणे (करकंब)व संगीत उपासक कै. पुरुषोत्तम काका खडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ  व भगवानराव मनमाडकर परिवार व कलारसिक यांच्या अनमोल सहकार्यांने पंढरपूर येथे भारतरत्न पं भिमसेन जोशी यांचे शिष्य  किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. हरिशजी तिवारी यांचे गायन आयोजित करण्यात आले होते.


फोटोओळ:  पं. हरीश तिवारी यांच्या मैफिलीचे दीपप्रज्वलन करताना आमदार प्रशांतमालक परिचारक, एड.जयवंत महाराज बोधले.गायक पं. हरीशजी तिवारी,भगवान मनमाडकर, शुभांगी ताई मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे

सुरूवातीला मा.आमदार प्रशांतराव परिचारक. ह.भ.प.अँड जयवंत महाराज बोधले.भगवान राव व शुभांगीताई मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाणे. प्रवीण खडके,यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले.नंतर मान्यवर कलाकांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन पदी निवड झाले बद्दल मनमाडकर परिवाराचे वतीनं प्रशांत मालकांचा सत्कार करण्यात आला. पुढील काळात निश्चित तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत करत रहा असे सांगितले.अँड.जयवंत महाराजांच्या मनोगता मध्ये गायकांचे प्रकार सांगितले. भाऊक गाण पं हरीशजींच आहे अस सांगून नंतर पं हरिशजी यांच्या गायनाला सुरुवात झाली. गुरुंचा भिमसेनी आवाजाच्या स्वरांनी रसिकांना सुरूवाती पासूनच आकर्षित केले.त्यांनी यमन रागातील बडा ख्याल विलंबित एकताला मध्ये गायला.गायनातील रियाजी आवाज,स्वरलगाव,आलापी,ताना,ऐकून पंढरपूर कर रसिक धन्यधन्य होत होते.


त्यानंतर बंदीश शाम बजाई आज मूरली बंदीश व त्याला जोडून ठूमरी गायली त्यानंतर पं भिमसेनजी यांनी अजरामर केलेले अभंग पंढरी निवासा.अणूरणीया थोकडा,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ,जय दुर्गे दुर्गती परी हारीनी.बाजे रे मुरलीया बाजे.आदी गावून रसिक मंत्रमुग्ध झाले.शेवटी भैरवी जो भजे हरी को सदा वही परम सुख पाहता गावून सांगता झाली.सुमारे अडीच तास श्रोता मंत्रमुग्ध झाला,त्यांना तितकीच सुंदर साथ नजाकतता महेश देसाई (तबला) धीर गंभीर पखवाज साथ ज्ञानेश्वर दुधाणे यांनी तर तितकीच लीलया हार्मोनियम वर फिरणारी बोटे ज्ञानेश्वर सोनवणे व धनंजय मनमाडकर (टाळ)वैभव केंगार,राजेश खिस्ते. (तानपुरा)यांनी केली.पुरुषोत्तम खडके यांनी स्वरसाधनेच्या माध्यमातून अनेक कलाकार पंढरपूर मध्ये आणले होते यापुढीलही काळात दर्जेदार कलाकार पंढरपूरात यावेत अशी भावना सर्व रसिकांनी व्यक्त केली. रसिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधूरी जोशी,गौरी अंमळनेर यांनी करुन आभार संकेत कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भगवानराव मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर,ज्ञानेश्वर दुधाणे, माधुरीताई जोशी,प्रसाद कुलकर्णी.धनंजय मनमाडकर,प्रवीण खडके, संकेत कुलकर्णी,माऊली खरात,वैभव केंगार,सुधीर भोरकर,दुर्गेश बडवे,संगीत महिला मंडळ,आदींनी परिश्रम केले  पुढील महिन्याच्या १९ तारखेलाही ख्यातनाम गायक नागेश आडगावकर यांचे गायन मासिक संगीतसभेत होणार आहे.