Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत

  DAVशैक्षणिक संकुल करकंब येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करकंब:-22डिसेंबर  डी.ए.व्ही शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ये...

 


DAVशैक्षणिक संकुल करकंब येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा

करकंब:-22डिसेंबर 

डी.ए.व्ही शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे आज 22डिसेंबर थोर भारतीय गणिततज्ञ,भारताचा दुसरा कोहीनूर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.शालेय स्तरातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा,विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने स्काऊट मास्तर एम.के पुजारी यांच्या संकल्पनेतून गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन "गणित जत्रा" भरविण्यात आले.

     या गणित प्रदर्शनामध्येप्रशालेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मनातील संख्या ओळखणे,गणिती कोडे,भौमितिक आकृती,पाढे चक्र,गणिती दिनदर्शिका,चलन वृक्ष, सुत्राचे झाड,रोमन संख्या आलेख,चलनी नोटाची बेरीज- वजाबाकी,संख्या पट्टीने बेरीज करणे,भौमितिक आकृतीचे नमुने अश्या विविध शैक्षणिक गणित साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले.

    यावेळी प्रशालेतील गणित विभाग प्रमुख नागेश घुले यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे निरीक्षण व परीक्षण करून साहीत्याचे नंबर काढले.नागेश घुले यांनी आपल्या मनोगत भाषणामध्ये गणिताचे जीवनातील महत्त्व व थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहीती सांगीतले. तसेच पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीसाहीत्याचे कौतुक केले.

यावेळी प्रशालेतील मुख्याध्यापक हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,  गणित विषय प्रमुख नागेश घुले,गणित शिक्षक अतुल अभंगराव,संजय पाटील, मनिषा ढोबळे,अश्विनी शिंगटे,उत्पात मॅडम उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पंचवाडकर, अभिषेक चोपडे,विनय कुलकर्णी,सुरेश दहिगीरे,शुकूर बागवान, अर्जून भंडारे,सुभाष चौगुले,रमेश कविटकर, माधव कांबळे यांनी विशेष परीश्रम घेतले.