Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशालेमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा तर माजी विद्यार्थ्यांनी ॲम्प्लीफायर सेट दिला भेट

  श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आज 22 डिसेंबर 2021 रोजी प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात ...

 


श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आज 22 डिसेंबर 2021 रोजी प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी राधिका देशपांडे हिने रामानुजन यांची माहिती सांगितली.

तर 1992 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा प्रशालेत 12 डिसेंबर 2021 रोजी संपन्न झाला होता. प्रशालेची आठवण म्हणून ऍम्प्लिफायर देण्याचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे ठरले होते त्यानुसार आज सुमारे साडे अकरा हजार रुपये किमतीचा अहुजा कंपनी चा ऍम्प्लिफायर प्रशालेत भेट देण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दीपक इरकल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केले. भेटीचा स्वीकार मुख्याध्यापक जयंत हरिदास व पर्यवेक्षक दत्तात्रय धारूरकर यांनी केला.जयंत हरिदास यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून दीपक इरकल, अमित वाडेकर, समीर डांगे, तुकाराम जावळे, दयानंद विभूते, सुरेंद्र कबाडे तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, तर  जेष्ठ शिक्षक अनिल अभंगराव गणित शिक्षक बं.ह. गुलाखे, ज.ह. डांगे, घ. त्र्यिं. चांडोले, अ.अ. कुरे, ग.ब. गंगेकर, रि. या. मुलाणी इत्यादिंनी रामानुजन यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर थिटे यांनी केले.