Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

डी.ए.व्ही शैक्षणिक संकुल येथे "सानेगुरुजी कथामाला चे आयोजन

करकंब:- 24डिसेंबर साने गुरूजी जयंतीनिमित्ताने  करकंब येथील डी.ए.व्ही. शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे भारतीय स्वातंत्र्यसैनीक,थो...

करकंब:-

24डिसेंबर साने गुरूजी जयंतीनिमित्ताने 

करकंब येथील डी.ए.व्ही. शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे भारतीय स्वातंत्र्यसैनीक,थोर विचारवंत, आयुष्यातील अनेक वर्षे मुलांनवर संस्कार करणारे व खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही तळमळीची हाक मानवजातीला देणारे,राष्ट्रसेवादलाचे संस्थापक,साधना मासिक चे संस्थापक,स्वातंत्र्यसेनानी, आदर्श शिक्षक पांडुरंग सदाशिव साने(साने गुरूजी) यांच्या जयंती दिन मोठ्या उत्साहाने संपन्न.

 सानेगुरुजी जयंतीनिमित्त आज प्रशालेत सानेगुरुजी कथामालेचे आयोजन करण्यात आले.

    यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी साने गुरूजीच्या जीवन कार्याबद्दल व  श्यामची आई या विषयी  माहीती सांगीतले,पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी सानेगुरूजीनी केलेले आंदोलनाची माहीती सांगीतले. प्रदीप पवार यांनी श्यामची आई या पुस्तकावर आधारीत माहीती,बालपणापची गोष्ट सांगीतले,संगीत शिक्षक संजय पंचवाडकर यांनी साने गुरुजींनी लिहीलेल्या गीतांचे *"गीतमंच"* सादर केले. 

 या गीतमंचा मध्ये आता उठवू सारे रान,आता पाठवू सारे रान,बलसागर भारत होवो,खरा तो एक ची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे हे गीत सादर करून सानेगुरूजीचे जीवनचरित्रावर माहीती चे सादरीकरण केले.यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत  करळे, नरसिंग एबोते, संजय पंचवाडकर,अतुल अभंगराव,संजय पाटील,मनिषा ढोबळे,आश्विनी शिंगटे,प्रदीप पवार,एम.के.पुजारी उपस्थित होते.

   सदर कार्याक्रमाचे नियोजन व  सूत्रसंचालन स्काऊट मास्तर एम.के.पुजारी यांनी केले.