Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेची शाळा व्यवस्थापन समितीचे पूनर्गठन.नुतन अध्यक्ष पदी दीपक वसेकर यांची निवड

वाफळकरवस्ती (बार्डी) शाळेतील कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळा व्यवस्थापन समिती पूनर्गठीत करुन  नुतन निवडी पार पडल्या.त्यामध्ये सर्व पालक...

वाफळकरवस्ती (बार्डी) शाळेतील कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळा व्यवस्थापन समिती पूनर्गठीत करुन  नुतन निवडी पार पडल्या.त्यामध्ये सर्व पालकांच्या उपस्थितीत मा.श्री. दीपक भागवत वसेकर यांची अध्यक्ष पदी तर नितीन भारत वसेकर यांची उपाध्यक्ष पदी तर नियमानुसार सर्व सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. 

यावेळी मुख्याध्यापक श्री. किरण ढोबळे.सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे. यांनी शाळा व्यवस्थापन समिती ची कामे व कर्तव्ये कोणकोणती आहेत. पुढील काळात करावयाची कामांचे स्वरूप सांगून शाळा गुणवत्ता पूर्ण बनवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करुया असे सांगितले. अध्यक्ष दीपक वसेकर यांनी सर्वांच्या सहकार्यातून शाळा पुढे नेऊयात असे सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष बिभीषण वसेकर,रामा कवडे यांनी मागील काळातील दिलेल्या योगदानामुळे  तर नुतन सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी वाफळकर वस्ती वरील सर्व पालक,ग्रामस्थ,उपस्थित होते.