Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अनुसूचित जातीवरील अन्याय सहन करणार नाही : खूपसे पाटील

  लहुजी शक्ती सेनेच्या पदयात्रेला 'जनशक्ती' संघटनेचा पाठिंबा  कुरुल / प्रतिनिधी  राज्यातील मातंग समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित...

 

लहुजी शक्ती सेनेच्या पदयात्रेला 'जनशक्ती' संघटनेचा पाठिंबा

 कुरुल / प्रतिनिधी

 राज्यातील मातंग समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जाती करता एकत्रित असलेल्या 13 टक्के आरक्षणाची व अनुसूचित जातीसाठी असलेल्या सर्व योजनांची अबकड नुसार वर्गवारी करण्यात यावी. मातंग समाजाच्या या महत्त्वपूर्ण मागणीसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तात्काळ स्थापन करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी देशभरातील मातंग समाज वेळोवेळी आवाज उठवित आहे. मात्र शासन या समाजावर जाणून बुजून अन्याय करत असून अनुसूचित जातीवरील होत असलेला हा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केले.

 लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी लहुजी वस्ताद तालीम पासून आझाद पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला जनशक्ती संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की सन 1822 आली ब्रिटिश काळातील देशातील पहिली क्रांती शाळा पुणे गंज पेठ येथे बांधण्यात आली, त्या लहुजी वस्ताद तालीम राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. मातंग आरक्षण लढ्यातील शहीद स्व.संजयभाऊ तकतोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करावी यासह अनेक मागण्या साठी लहुजी शक्‍ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी लढा उभारला असून या लढ्यात जनशक्ती संघटना पूर्ण ताकतीने उतरेल असे त्यांनी शेवटी सांगितले. दरम्यान आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी देखील जनशक्ती संघटना मैदानात असेलअसेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई महिला आघाडी प्रमुख विनिता बर्फे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबाराजे कोळेकर पश्चिम महाराष्ट्र, बदलापूर अध्यक्ष जितु पवार, उपाध्यक्ष आकाश चव्हान, पनवेल तालुका अध्यक्ष अमोल राठोड, अनी रेडी, रिना घोडसे, निशा दुराफे, मुंबई महिला उपाध्यक्ष चारू पाटिल यांच्यासह जनशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.