Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

केदार केळकर यांच्या गायनाने करकंब कलारसिक मंत्रमुग्ध

  सद्गुरु परमपूज्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त करकंब येथे ख्यातनाम गायक केदार केळकर यांच्या सुंदर मैफिलीचे आयोजन करण्यात आले हो...

 


सद्गुरु परमपूज्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त करकंब येथे ख्यातनाम गायक केदार केळकर यांच्या सुंदर मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला चौंडेश्वरी माता व गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री केदार केळकर श्री प्रभाकर टेके, विजय भागवत,संतोष बुगड,प्रभाकर वास्ते, संजय कुमार म्हेत्रे, मिलिंद देशपांडे,संतोष पिंपळे,ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

 यानंतर केदार केळकर यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यांनी राग शाम कल्याण मध्ये सावन की सांज भयी या बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर तराणा नाट्यसंगीत त्यामध्ये तात करी दुहिता विनाशा कोण, तुज सम सांग मज गुरुराय.अशी सुंदर नाट्यगीत गाऊन या पंढरीचे सुख पाहता डोळा, ध्यान करु जाता मन हरपले, ब्रह्मचैतन्य सारखा नाही पाहिला, असे सुंदर अभंग गाऊन शेवटी  शिव के मन शरण हो भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तितकीच सुंदर साथ-संगत अमेय बिचू तेजस माजगावकर ज्ञानेश्वर दुधाने माऊली पिसे यांनी केली यावेळी कोरोनाचे नियम पाळून रसिक उपस्थित होते सर्वांनी केदार केळकर यांच्या गायनाला सुंदर प्रतिसाद देत कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा दिली अखंड चालणाऱ्या रामनाम सप्ताहामध्ये २९ तारखेला श्री गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आहे. 


पहाटेपासून काकड आरती पालखी मिरवणूक व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन आहे तरी सर्व रामनाम जप कार प्रेमींनी उपस्थित राहून याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सेवेकरी श्री प्रभाकर रसाळ मंगल रसाळ यांनी केले आहे या कामी सर्व जप कार प्रेमी परिश्रम घेत आहेत.