Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब येथे उत्साहात साजरा

करकंब : सद्गुरु गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त करकंब येथे चोंडेश्वरी मंदिरामध्ये दिनांक २२ डिसेंबर ते २९डिसेंबर श्री रामनाम सप्ताहाचे आय...


करकंब : सद्गुरु गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त करकंब येथे चोंडेश्वरी मंदिरामध्ये दिनांक २२ डिसेंबर ते २९डिसेंबर श्री रामनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये दररोज तेरा तासाचा राम नाम जप ,पहाटे काकड आरती,महानैवेद्य, भजन, कीर्तन, आणि गायनाचे कार्यक्रम पार पडले. यामध्ये केदार केळकर यांची अभंगवर्षा वर्षा ,ह.भ.प.संदीप बुवा मांडके यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले तसेच २९ डिसेंबर रोजी सद्गुरु गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त पहाटे श्री महाराजांचा अभिषेक पूजा व काकड आरती व्रुषाली बोधे यांच प्रवचन आणि गुलालाचा कार्यक्रम झाला तसेच तसेच दुपारी तुषार कवडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी जप संकुलातील जपकार व रामनाम प्रेमी उपस्थित होते. सदरचा नाम सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री. प्रभाकर रसाळ, ज्ञानेश्वर दुधाने, विजय भागवत,मोहन बोधे, मोहन रसाळ ,ज्ञानेश्वर पिसे,दत्तात्रय इदाते,बाळासाहेब इदाते,मंगल रसाळ,पल्लवी टकले,वृषाली बोधे, उषा पिसे, दयानंद आलेकर सर्व ग्राम नामजप प्रेमींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.