Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंबच्या लेकीचं झाडं हे अभियानाचा करकंब मध्ये 20 नोव्हेंबरला शुभारंभ

नाशिक येथून सायकल वारी करणारे वारकरी यांचे हस्ते होणार उद्घाटन करकंबच्या लेकीचं झाडं हे अभियान कनकंबामाता व प्रभू रामचंद्राच्या आशिर्वादाने...

नाशिक येथून सायकल वारी करणारे वारकरी यांचे हस्ते होणार उद्घाटन

करकंबच्या लेकीचं झाडं हे अभियान कनकंबामाता व प्रभू रामचंद्राच्या आशिर्वादाने म्हणजे २० नोव्हेंबर सायं ४:०० वा शंकरनगर रोडवर नाशिक येथील सायकल वारी करणारे वारकरी व करकंबच्या लेकी यांचे शुभहस्ते सुरुवात करत आहोत. हे अभियान गावमान्य होण्यासाठी व ते यशस्वीपणे राबवण्यासाठी करकंब मधील लेकीचं सहकार्याची नितांत आवश्यकता तर आहेच.शिवाय यासाठी तरुण वर्गाच श्रमदान करण्यासाठी व त्याला वेळ देण्याची खुप मोठी महत्वाची जबाबदारी तरूण वर्गाची आहे.हे अभियान राबवताना झाड कुठं लावायची,भविष्यात तिथे कसलीही अडचड न येता झाडाची वाढ झाली पाहिजे, उन्हाळ्यापर्यंत लावलेली झाडं टिकवण्यासाठी नियमित पाण्याचं नियोजन करणे आवश्यक आहे,सुरुवातीला ५० झाडांच नियोजन आणि जोपासना करण्याच काम आम्हीं हाती घेतोय.जसजशी याची व्याप्ती वाढेल तसतशी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा व जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करू.यासाठी गावातील सर्व पदाधिकारी, तरुण नागरिक ग्रामस्थ.पत्रकार बंधू, महिला भगिनी,यांनी हे अभियान सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याच काम मोठ्या प्रमाणात करावे लागणार असून तरच हे गावच्या लेकीच झाडं अभियान यशस्वी होणार आहे. या अभियानात ज्या तरुणांना तन,मन,धनानी निस्वार्थी भावनेनं सहभागी व्हायच आहे.यामध्ये कुठली एक व्यक्ती अथवा संस्था सहभागी नसून गावाच अभियान आहे या भावनेन एकत्र काम करायच आहे. ज्यांना अर्थिक सहकार्य करायचे आहे त्यांनी खालील मोबाईल वर संपर्क साधून सहकार्य करावे. 

झाडं ट्रीगार्ड तुमचे अन जोपासना करण्याचे काम आमचे असा विश्वास व्यक्त करुन अभियानात सहभागी होण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे सहकारी यांनी अहवान केले आहे.सदर अभियान यशस्वी होण्यासाठी नंदलाल कपडेकर, गणेश.पिसे.प्रमोद रेडे,गणेश.पिसे,अक्षय नगरकर, विजय जाधव,हरिश्चंद्र वास्ते, विजय शिंगटे, अमोल देवळे,विजय दुधाणे.गोविंद जाधव,सुनील शेटे,पांडुरंग काथवटे,आदी तरुण अधिक परिश्रम घेत आहेत.

अभियानात सामील होण्यासाठी संपर्क ९७६७७७६८५८

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳