Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशालेत"वाचन प्रेरणा दिन" साजरा

करकंब दि.15 ऑक्टो.        डी.ए.व्ही. शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे माझी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम...


करकंब दि.15 ऑक्टो. 

      डी.ए.व्ही. शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे माझी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात आला.

    शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने "महात्मा आनंद स्वामी सरस्वती ग्रंथालय" च्या वतीने ग्रथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आले.मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी शासन परीपत्रकानुसार कोविड नियमांचे काटेकोर पालन करून प्रशालेतील ग्रंथालयाच्या वतीने मराठी साहीत्याचे विद्यार्थी वाचन घेण्यात आले.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी मिसाईल मॅन,भारतरत्न स्व. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रांची माहीती विद्यार्थ्यांना सांगीतले.

पुस्तकांचे महत्व,ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांची माहीती,कथा, कादंबरी, स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे यादी,गोष्टी व कथा पुस्तकांची माहीती व यादी, विविध विषयाचे संदर्भ ग्रंथ माहीती महात्मा आनंद स्वामी सरस्वती ग्रंथालयाचे प्रमुख एम.के.पुजारी यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले. सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना पाहण्यास प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.


यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे,मराठी विभाग प्रमुख सुरेश दहिगीरे,इंग्रजी विभाग प्रमुख विनय कुलकर्णी,गणित विभाग प्रमुख नागेश घुले, जेष्ठ शिक्षक नरसिंग एबोते, अतुल अभंगराव,संजय पाटील,अभिषेक चोपडे,मनिषा ढोबळे,अश्विनी शिंगटे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.