Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ज्ञानेश्वर दुधाणे यांना डॉ. कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान

डॉ. ए.पीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल सोलापूर यांचेवतीनं प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्...


डॉ. ए.पीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल सोलापूर यांचेवतीनं प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्तिंना डॉ. कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.


सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली,पुरस्कार मिळालेल्या सर्वांची मनोगत ऐकून सर्वांना एक प्रकारची नवी प्रेरणा मिळाली,  उपस्थित मान्यवरांच्या मनोगतानंतर करकंब सारख्या ग्रामीण भागामध्ये सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक.क्षेत्रात भरीव कामगिरीची ड्रीम फाउंडेशन यासंस्थेने दखल घेऊन ज्ञानेश्वर दुधाणे यांना मा.आ.शिवशरण पाटील बिराजदार,शिवचरीत्रकार शिवरत्न शेटे,शास्त्रज्ञ डॉ..लालासाहेब तांबडे, नुतन सी.ए.श्री. मंता,काशिनाथ भतगुणकी यांचे उपस्थितीत यांना डॉ. कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनोगतात त्यांनी आपण कसे घडलो,सतत आपल्या कामात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते,सांस्कृतिक क्षेत्रात पं शौनक अभिषेकी यांचेमुळे खुप काम करण्याची संधी मिळाली. शैक्षणिक क्षेत्रात मुलांना घडवण्याच काम मनाला समाधान देऊन जाते.सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून श्रीराम प्रतिष्ठान, नादब्रह्म कला फाउंडेशन. पं.विकास कशाळकर फाउंडेशन यांचे माध्यमातून शैक्षणिक. सांस्कृतिक. व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा सतत मिळत राहील असे विचार व्यक्त केले. शेवटी संगीता बिराजदार यांनी सर्वांचे आभार मानले.