Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भाजीपाल्याचे लिलाव सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत चालू ठेवावेत बळीराजा मागणी...!!!

  पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांच्या मालाचे सौदे चांगल्या पद्धतीने घेतले जातात त्याला दर चांगला मिळतो पण लिलावाचे टाईम ...

 


पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांच्या मालाचे सौदे चांगल्या पद्धतीने घेतले जातात त्याला दर चांगला मिळतो पण लिलावाचे टाईम सकाळी पाच ते आठ किंवा संध्याकाळी करावे कारण शेतकऱ्याला दिवसभर आपले शेतातील काम करून थकवा येतो त्यामुळे त्यांना  झोपण्यास पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्याला झोपण्यास उशीर होतो पहाटे तीन वाजता सौदे चालू होतात म्हणून लिलावाचे टाइमिंग बदलावे अशी सर्व शेतकरी बांधवांची आपणास विनंती आहे...

तसेच शेतकऱ्यांनी आणलेलेल क्रेट आम्हाला जाग्यावर देण्यात यावे तरी बाजार समितीने आम्हा सर्व शेतकरी बांधवांचा विचार करावा आणि अनामत माल‌ जाऊन राहिलेल्या मालाची योग्य मागणी होत नाही त्यासाठी आडत दारांनी तोमाल अनामत न देता उघड लिलाव पद्धतीने सौदे करून द्यावी ही नम्र विनंती मागणी मान्य न केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरच्या गेट समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल...

यावेळी बाजार समिती पंढरपूर सचिव श्री.घोडके साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, पंढरपूर तालुकाध्यक्ष रमेश लंगोटे, शेतकरी रहिम मुलाणी, बालाजी वाघ, रमेश कुंभार,दाजी चव्हाण उपस्थित होते...