Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

दीपक कलढोणे यांच्या शास्त्रीय गायन व अभंगवाणी ने पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध

मंगळवार दि.19 /10/2021 रोजी  कै.पुरूषोत्तम काका खडके यांच्या चतुर्थ मासिक संगीत सभेचे पुष्प पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री. दीपक...

मंगळवार दि.19 /10/2021 रोजी  कै.पुरूषोत्तम काका खडके यांच्या चतुर्थ मासिक संगीत सभेचे पुष्प पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री. दीपक कलढोणे यांच्या सुमधूर स्वरांनी गुंफले.यावेळी सुरुवातीला खडके काकांच्या प्रतिमेच पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नंतर दीपक कलढोणे यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरूवातीला शास्त्रीय गायनात राग मारव्यामध्ये विलंबित एकतालात ख्याल गायल्या नंतर बंदिश. तराणा राग शिवरंजनी,मंदरवा आयो,एक सुर चराचर छायो,अनंता तुला कोण पाहू शके,अवघे गर्जे पंढरपूर ,शेवटी ,कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी सुंदर गायनाला सुंदर तबला साथ प्रसाद कुलकर्णी. हार्मोनियम निरज कलढोणे.तानपूरा वर्धराज मिर्जी. अरूण भुजबळ,व वैभव केंगार तर टाळसाथ भैय्या मनमाडकर यांनी केली,यावेळी निरंजन महाराज मनमाडकर यांनी सुंदर देवीभग्वतकथा सादर केल्याबद्दल व ज्ञानेश्वर दुधाणे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मिळाल्या बद्दल रसिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कोजागिरी पौर्णिमे निमत्ताने खडके परिवाराच्या वतीनं सुगंधी दुधाचे आयोजन करण्यात आले होते.

या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन भाऊ मनमाडकर. भैय्या मनमाडकर. शुभांगी ताई मनमाडकर. माधुरीताई जोशी.डॉ. मिलिंद जोशी.प्रवीण खडके,ज्ञानेश्वर दुधाणे.व संगीत रसिकांच्या वतीनं करण्यात आले होते.यावेळी पंढरपूरकर रसिक श्रोता मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुढील मासिक संगीत सभा १९ नोव्हेंबर रोजी अपर्णाताई बनवसकर यांची होणार आहे.सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती...


Advertise