Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

गौरव आरोग्य सेवकांचा ,करकंब मनसेतर्फे कोविड योद्ध्यांचा सत्कार व ९ मनसे शाखांचे उद्घाटन.

 करकंब वडार भवन, तालुका पंढरपूर येथे मंगळवार दिनांक १९.१०.२०२१ रोजी गौरव आरोग्य सेवकांचा या उपक्रमाअंतर्गत करकंब येथील ग्रामीण रुग्णालयातील ...

 करकंब वडार भवन, तालुका पंढरपूर येथे मंगळवार दिनांक १९.१०.२०२१ रोजी गौरव आरोग्य सेवकांचा या उपक्रमाअंतर्गत करकंब येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तुषार सरवदे,डॉक्टर दांडेकर, सूर्यकांत कुरणावळ, बापू गायकवाड, रवी परमार, सुनील नवगिरे व रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच करकंब मधील सर्व आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता देशपांडे, यांच्या सत्काराचे आयोजन मनसे करकंब शाखेतर्फे करण्यात आले होते. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे, लक्षमण वंजारी,सिंहगड कॉलेजचे बडेकर सर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तुषार सरवदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांचे आभार मानले तसेच मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून यापुढेही त्यांनी अशाच प्रकारचे सामाजिक कार्य चालू ठेवावे असे मनोगत व्यक्त केले.

कोविड योद्ध्यांच्या सत्कार समारंभानंतर करकंब गावामध्ये इंदिरानगर, सोमवार पेठ, काळा मारुती, थोरली वेस, माळी गल्ली, टिळक चौक, मेकॅनिकल चौक, एसटी स्टँड इत्यादी ९ ठिकाणी मनसे शाखांचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

  
याप्रसंगी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, बाबू वागस्कर, मनसे पुणे शहर महिला अध्यक्षा वनीता वागस्कर, माजी डी वाय एस पी रघुनाथ जाधव, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गीड्डे, मनसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,ता.अध्यक्ष शशिकांत पाटील,सहकार सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णात मशाळ,बाळासाहेब टोळके, माढा ता.अध्यक्ष सागर लोकरे,सागर बंदपट्टे, हेमंत पवार, धनाजी चव्हाण, मनसे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष संजय गायकवाड, करकंब शहराध्यक्ष बालाजी पवार, सिंहगड कॉलेजचे बडेकर सर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे पंढरपूर तालुका मनसे विद्यार्थी संघटना अध्यक्ष सचिन माळी, इतर पदाधिकारी, मनसे सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Advertise