Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

वाफळकरवस्ती वरील ग्रामस्थ व शिक्षकांची आदर्श चिंचणी गाव व शाळेस भेट

करकंब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती  स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आज वाफळकरवस्ती वरील ग्रामस्थ व शिक्षकांनी पंढरपूर तालुक...


करकंब :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती 
स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आज वाफळकरवस्ती वरील ग्रामस्थ व शिक्षकांनी पंढरपूर तालुक्यातील आदर्श गाव चिंचणी गावासव शाळेस भेट दिली.

या भेटी दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कोणकोणत्या नवीन संकल्पना आहेत तशा संकल्पना वाफळकरवस्ती शाळेत राबवायच्या आहेत,त्यासाठी तेथील उपक्रम व स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत केलेल्या बाबींची माहिती घेतली.तेंव्हा शाळेतील अद्यावत वर्गखोल्या, नाविन्यपूर्ण हवेशीर खिडक्या,अद्यावत प्रयोगशाळा,कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यासिका,अद्यावत विश्रांतीग्रुह,वरदायिनी मातेचे मंदिर,स्मशानभूमी, ग्रामपंचायत नसताना सुध्दा अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय, प्रिसीजन ग्रुपनं सोलर व्यवस्थेसाठी केलेल योगदान आदी बाबी खुपच प्रेरणादायी वाटल्या,अशा प्रकारची सर्वांगसुंदर शाळा वाफळकरवस्ती करायची अशी इच्छा ग्रामस्थांनी बोलून दाखवली,यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन ग्रामस्थांनी केले.


यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बिभिषण वसेकर,मुख्याध्यापक किरण ढोबळे,ज्ञानेश्वर दुधाणे,ज्ञानेश्वर वसेकर,नितीन वसेकर,विनोद वसेकर,ब्रह्मदेव वसेकर,हणमंत वसेकर,रामा कवडे.सुरज वसेकर,आदी पालक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.