Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

एकरकमी एफआरपी च्या मागणीसाठी पंढरीत स्वाभिमानीचा शुक्रवारी मेळावा; मा. खासदार राजू शेट्टी येणार :अमर इंगळे

उंबरे : ऊस उत्पादकांना एकरकमी एफ आर पी  मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  घटस्थापनेपासून 'जागर एफआरपीचा' हे आ...


उंबरे : ऊस उत्पादकांना एकरकमी एफ आर पी  मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  घटस्थापनेपासून 'जागर एफआरपीचा' हे आंदोलन आराधना शक्ती स्थळापासून सुरू करणार असून तीर्थयात्रा स्वरूपातील हे आंदोलन 8 ऑक्टोंबर रोजी पंढरपुरात येणार आहे त्यादिवशी मंदिरात विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार आहे‌.त्यानंतर तनपुरे महाराज मठात शेतकरी मेळावा होईल. त्यात राजू शेट्टी भूमिका मांडतील व 19 ऑक्टोंबर च्या ऊस परिषदेचे निमंत्रण देतील घटस्थापनेच्या दिवशी आंदोलनास कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर पासून सुरुवात होणार आहे अशी माहिती संघटनेचे युवा आघाडीचे तालुकाप्रमुख अमर इंगळे यांनी दिली. यानंतर संत बाळूमामा आदमापूर, श्री दत्त मंदिर नरसोबावाडी,पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, लातूर ,परळी वैजनाथ ,पैठण, जामखेड, शिर्डी, भीमाशंकर ,दगडूशेठ गणपती पुणे ,जेजुरी अशी यात्रा जाणार आहे. एकरकमी एफ आर पी चा कायदा मोडून तीन टप्प्यात देण्याचा कायदा करण्यात राज्य व केंद्र सरकारने घाट घातला आहे.

एक रकमी कायदा असताना जिल्ह्यातील साखर कारखानदार तीन- तीन टप्प्यात एफआरपी देत आहेत. जर तीन टप्प्यात कायदा झाला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची शेती करणे तोट्याचे होईल. पंधरा-सोळा महिने शेतात सांभाळलेला ऊस कारखान्याच्या गाळप झाल्यानंतर उसाचे बिल मिळण्यासाठी वर्षभर थांबावे लागेल. या आंदोलनातून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान त्यांची होणारी लूट रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन इंगळे यांनी केलं आहे.