Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साप्ताहिक करकंब दर्शन च्या दिवाळी अंकासाठी विद्यार्थीही लिहू शकतात लेख आणि काढू शकतात मुखपृष्ठासाठी चित्र...

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी Watch on YouTube वर क्लिक करा. नमस्कार, साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS YOUTUBE CHANNEL, करकंब दर्शन न्यूज पोर्टल...

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी Watch on YouTube वर क्लिक करा.

नमस्कार,

साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS YOUTUBE CHANNEL, करकंब दर्शन न्यूज पोर्टल सातत्याने करकंब साठी विविध पातळीवर व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करीत आहे.

यापूर्वी दीपावली विशेषांकासाठी विविध विषय हाताळलेले आहेत. अगदी करकंब च्या इतिहासापासून करकंबला विशिष्ट ओळख देणाऱ्या व्यक्तींपर्यंत...

परंतु या वर्षीचा विशेषांक खरंच विशेष असणार आहे. आम्ही खाली सहा विषय देणार आहोत या सहा विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात निबंध वजा लेख लिहायचा आहे. अर्थात इयत्ता नववी पासून पुढील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात विद्यार्थी नसाल तर तुम्हाला शब्द मर्यादेचे बंधन असणार नाही. सर्वोत्कृष्ट लेखांना दिवाळी अंकात प्रसिद्धी दिली जाईल.

लेख कसा पाठवाल ?

ईमेल अथवा व्हाट्सअप वर टाईप करून पाठवावा सोबत हस्तलिखिताची प्रत कार्यालयात जमा करावी. ज्यांना कार्यालयात येऊन हस्तलिखिताची प्रत देणे शक्य नाही त्यांनी ईमेलवर लेखाची पीडीएफ पाठवावी. लेखाच्यावर साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक 2021 असे स्पष्ट लिहावे. टाईप केलेल्या लेखामध्ये अथवा हस्तलिखित यामध्ये लेखाखाली तुमचे नाव पत्ता व्हाट्सअप चा मोबाईल क्रमांक द्यावा त्यासोबत तुमचा आयडेंटी फोटोही द्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्ता , शाळा / काॅलेजचे नाव लिहावे.

लेखाचे विषय 

१. करकंब काल आज आणि उद्या

२. ऋण माझ्यावर या मातीचे 

३. कोरोनाशी लढलं असं माझं गाव

४. माणसं माझ्या मनातील, हृदयातील

५.माझं गाव माझ्या अपेक्षा

६. कोरोनानं काय दिलं आणि काय नेलं ?

वरील विषयांपैकी एका विषयावरील लेख 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत द्यावेत.

मुखपृष्ठाबाबत

यावर्षीच्या मुखपृष्ठासाठी कलाकारांना संधी देण्यात येणार आहे.

यासाठी वयाची अट नाही, विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात.

चित्रासाठी विषय आहे 'माझ्या गावची ओळख'

या विषयावर कोणत्याही रंग माध्यमाचा वापर करून 38 × 28 c.m. च्या ड्रॉईंग पेपर वर कागद उभा अथवा आडवा धरून चित्र काढावे सर्वोत्कृष्ट चित्रास अथवा चित्रांना मुखपृष्ठावर संधी दिली जाईल. चित्र कार्यालयात जमा करावे लागेल. चित्राच्या पाठीमागे पूर्ण नाव, पत्ता, व्हाट्सअप मोबाईल नंबर लिहावा व सोबत आयडेंटी फोटो द्यावा. 11 ऑक्टोबर 2021 पूर्वी आपले चित्र कार्यालयामध्ये जमा करावे.

तेव्हा वेळ कशाला दवडता लागा नवनिर्मितीला आणि आपला लेख अथवा कलाकृती दिनांक 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत पोहोचवा. 

त्याचबरोबर कविता, विनोद, पाककृती, विनोद इ. साहित्यही खालील वाॅट्स ॲपवर पाठवू शकता.

लेख व साहित्य पाठवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक 9011634250

ई-मेल : karkambdarshan@gmail.com

दीपावली अंकाच्या जाहिरातीसाठी संपर्क:

श्री. लक्ष्मण जाधव 9158 016349

सौ. थिटे मॅडम 9011634260

आमचा पत्ता

साप्ताहिक करकंब दर्शन

C/O. गॅलॅक्सि इंग्लिश मिडीयम स्कूल,

व्यवहारे गल्ली, थोरल्या वेशीजवळ, करकंब ता.पंढरपूर जि. सोलापूर 413302


विशेष सूचना : साहित्य अथवा कलाकृती प्रकाशित करण्याचा संपूर्ण अधिकार संपादक मंडळाचा राहील.


Advertise