Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प. प्राथ. वाफळकरवस्ती शाळेला पालकांच्या वतीने दिड लाखाची (१५००००/-) देणगी

करकंब : आज  २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहद्दुर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त पालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. ...



करकंब : आज  २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहद्दुर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त पालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी शाळा चालू होतील त्यासाठी स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवण्यासाठी सर्व पालकांना मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी अवाहन केले.त्यासाठी निधीची आवश्यकता असून कोणकोणती कामे करायची आहेत त्याची माहिती ज्ञानेश्वर दुधाणे यांनी दिली.त्यावेळी त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत सर्व पालकांच्या वतीन दीड लाख १५००००/- रोख निधी उपलब्ध करून दिला.

त्या निधीत शाळा स्वच्छ अभियानातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी पालकांनी सहकार्य करू असे सांगितले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही चांगली करण्यासाठी शिक्षकांंनीही प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले.अशावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिभिषण वसेकर ग्रामस्थ गोरख वसेकर.कांतीलाल वसेकर.सुनिल वसेकर.ज्ञानेश्वर वसेकर.विनोद वसेकर.अशोक बनसोडे.नितीन वसेकर.ब्रह्मदेव वसेकर.संतोष माळी .हणमंत वसेकर.अभिजित वसेकर.भानुदास माळी.रमेश वसेकर.दिपक वसेकर.सावता वसेकर.महेश वसेकर.आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने देणगीदारांचे व पालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

ADVERTISE