Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सज्जन खडके सेवानिवृत्त; मान्यवरांच्या उपस्थितीत हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचा सत्कार समारंभ संपन्न

करकंब : करकंब मधिल आदर्श शिक्षक श्री. सज्जन खडके यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ संपन्न... करकंब येथील आदर्श हुन्नहरी शिक्षक श्र...


करकंब : करकंब मधिल आदर्श शिक्षक श्री. सज्जन खडके यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ संपन्न...


करकंब येथील आदर्श हुन्नहरी शिक्षक श्री.सज्जन खडके यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.सभापती रजनीताई देशमुख. पं स.सदस्य राहुल पुरवत.अँड.शरदजी पांढरे.उपसरपंच आदिनाथ देशमुख.प्रा.सतिश देशमुख.दिलीप पुरवत.अभिषेक पुरवत गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे साहेब.मोठेबंधू दिलीप खडके.जयश्री खडके.सौ.खडके यांची होती.

सदर बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी🖕 Watch on YouTube🖕 वर क्लिक करा.

प्रास्ताविक एकनाथ कुंभार यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांचे सत्कार खडके कुटुंबीयाच्या हस्ते करण्यात आल्या नंतर जि.प.प्राथ शाळा जळोली.शिक्षक समिती परिवार .करकंब शिक्षक शिक्षिका.ग्रामपंचायत करकंब.कै.दत्ता खारे प्रतिष्ठान. सर्व उपस्थित पदाधिकारी.शिक्षक मित्र.नातलग.यांचेवतीने ही भरगच्च सत्कार करण्यात आले. 

यानंतर देवकी कलढोणे.शिक्षक नेते सुनिल कोरे.सचिन लादे.ज्योतिराम बोंगे.जयश्री खडके.प्रा.सतिश देशमुख. अँड.शरद पांढरे.दिलीप नाना पुरवत उपसरपंच आदिनाथ देशमुख यांची मनोगत झाली त्यामधे चिरतरुण वाटणारे सज्जन खडके सरांबद्दल सर्वांनी गौरवोद्गार काढताना म्हटले की जुन्याचा अन नव्याचा स्विकार केला त्यामुळे ते तरुण शिक्षकात रमले.अनेकदा मोठ्या आजार झाले असताना सुध्दा त्यावर त्यांनी मात करत आदर्श विद्यार्थी घडवले.त्यांच्याकडे पाहिले असता सेवानिवृत्ती च्या काळातही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह दिसत होता.शेवटी सज्जन खडके सरांनी आपल्या मनोगतात आपले थोरले बंधू दिलीप दादा व वहिनी बद्दल आभार व्यक्त केले की त्याच्या मार्गदर्शनामुळे मी शिक्षकीपेशात आलो हे त्यांचे उपकार जीवनभर विसरणे शक्य नाही.तसेच त्यावेळी शाळेची परिस्थिती सगळीकडेच अतिशय बिकट होती अशा परिस्थितीत विद्यार्थी घडवल्याचे समाधान वाटत होते.तसेच आनंदी राहण्याच रहस्य सांगत असताना वाचनाची आवड सांगितली.वाचनामुळे मनुप्य समृद्ध बनतो असे सांगितले.यावेळी मित्रपरिवार. नातेवाईक व उंबरे करकंब केंद्रातील शिक्षक - शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम पार पडल्याच समाधान सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कापसे यांनी केले. आभार श्री किशोर गोडसे यांनी केले.यथेच्छ स्नेहभोजनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकमित्रांनी सहकार्य केले.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++

Advertise