Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

विद्यार्थीप्रिय शिक्षक विलास जगताप सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त ; संस्था व प्रशालेच्या वतीने सेवागौरव संपन्न

(सदर बातमी चा व्हिडिओ पाहण्यासाठी 🖕 Watch on YouTube🖕 वर क्लिक करा.) उंबरे : विद्या विकास मंदिर उंबरे (पागे) येथे प्रशालेच्या स्थापनेपासून...


(सदर बातमी चा व्हिडिओ पाहण्यासाठी 🖕 Watch on YouTube🖕 वर क्लिक करा.)


उंबरे : विद्या विकास मंदिर उंबरे (पागे) येथे प्रशालेच्या स्थापनेपासून श्री. विलास श्रीधर जगताप करकंब यांनी सहशिक्षक पदावर सेवा केली.

तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते आज 30 सप्टेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले.

अध्यापनासह क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. अनेक विद्यार्थी खेळ प्रकारात निपुण करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली. अध्यापनाच्या उत्कृष्ट शैलीमुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. एसएससी बोर्ड परीक्षेसाठी त्यांनी सलग अकरा वर्ष मॉडरेटर म्हणून काम केले. एक गुणी शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व भावी आयुष्य आरोग्यदायी जावो अशा सद्भावना व्यक्त केल्या.

सेवानिवृत्तीनिमित्त आज विद्या विकास मंदिर, उंबरे येथे सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष राजाराम नरसाळे पाटील, सचिव बी.बी. पाटील चेअरमन ज्ञानदेव ढोबळे, सदस्य जी. व्ही. कमले सर, लोंढे सर, मुख्याध्यापक बी.जे. शिंदे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी श्री जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात श्री. जगताप यांनी प्रशाले साठी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एन. शिंदे यांनी केले तर आभार के.सी. पाटील यांनी मानले.

करकंब येथील क्रीडा शिक्षकांच्या वतीने श्री. जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामभाऊ जोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत कदम, क्रीडाशिक्षक अशोक खपाले, पांडुरंग देशमुख उपस्थित होते.

------------------------------------------ Advertise----------------------------------------------------------------------