Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब रोटरी क्लब यांचेवतीने नेशन बिल्डर आवार्डचे उत्साहात वितरण

( यूट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी Watch on YouTube वर क्लिक करा.) करकंब : रोटरी क्लब जागतिक संघटनेच्या यांचेवतीने पूर्ण जगात आदर्श शिक्षक प...

( यूट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी Watch on YouTube वर क्लिक करा.)

करकंब : रोटरी क्लब जागतिक संघटनेच्या यांचेवतीने पूर्ण जगात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते.शिक्षक दिनाच औचित्य साधून करकंब रोटरी क्लबने ही या नेशन बिल्डर आवार्डचे वितरण बुधवार (दि.२९) रोजी सुवर्ण गार्डन मंगल कार्यालयात'  करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. शरदचंद्र  पांढरे,  संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांतकुमार मोरे, नुतन अध्यक्ष डाॅ. विनोद शिंगटे, रो.धनंजय इदाते, रो.सुनिल दुधाणे, रो.एल.एम जाधव, रो.सुनिल अडगळे, रो. डाॅ.  अक्षयकुमार  मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  आदर्श शिक्षक संतोष चव्हाण (उंबरे), मोहनसिंग रजपूत (न्यू इंग्लिश स्कूल, करकंब), मंगेश  नकाते (जि. प. प्रा. शाळा मुली नं. २),  सारिका फासे (शेळके वस्ती), तरन्नुम सय्यद( जि. प. प्रा. शाळा, पांढरे वसी), नागन्नाथ घाटुळे (जि. प. प्रा. शाळा, लोकरे वस्ती) यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान करण्यात आले.    

 

   

यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेला समर्थ संदीप अभंगराव या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच दत्तात्रय खंदारे, ज्ञानेश्वर दुधाणे, एल.एम.जाधव यांचाही त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल  यथोचित सन्मान करण्यात आला.

     यावेळी शरद पांढरे यांनी 'माझी वसुंधरा' उपक्रमा अंतर्गत सर्व शाळांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व शिक्षकांनी सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. 

सुरुवातीला प्रास्ताविकात डाॅ. प्रशांतकुमार मोरे यांनी रोटरीची ध्येय धोरणे व केलेल्या कामाची माहिती देऊन पुढील काळातही समाजोपयोगी कामे करणार असल्याचे सांगितले. 

    पुरस्कार प्राप्त शिक्षक मोहनसिंग रजपूत यांनी सांगितले की, आज पर्यंतच्या माझ्या शैक्षणिक सेवेच्या काळातील हा पहिलाच पुरस्कार असल्याने माझे अंत:करण भरुन आले. माझी मुलगी सलोनी हिच्या स्मृती प्रित्यर्थ   काही झाडे लावली आहेत. तर दोन मुली दत्तक घेऊन त्यांचा सहावी ते दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च करणार आहोत .

  उंबरेचे शिक्षक संतोष चव्हाण म्हणाले की, मला अनेक पुरस्कार मिळाले परंतू रोटरी क्लबचा हा पुरस्कार हा माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे. कोणताही प्रस्ताव दिला नसताना आम्ही केलेल्या कार्याचे हे फळ आहे.

  तरन्नुम सय्यद यांनी सांगितले की, मला हा पुरस्कार देण्यात येणार आहे हे समजताच फार आनंद झाला. यामुळे अजून चांगले काम करण्याची स्फूर्ती यामुळे मिळाली आहे.

  नागेश घाटुळे म्हणाले की, माझी वस्ती शाळेला नेमणूक झाल्यानंतर शाळाबाह्य मुले शाळेत आणण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. आता ही शाळा एक आदर्श शाळा झाली असून अनेक अधिकारी-पदाधिकारी यांनी भेटी देऊन कौतुक केले आहे. 

तसेच मंगेश नकाते, सारीका फासे, लक्ष्मण जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली.  

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व निवेदन  सुनिल अडगळे व डाँ.अक्षय मोरे यांनी केले.शेवटी आभार रो.सुनिल दुधाणे यांनी मानले.

   यावेळी करकंब केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

    याच दिवशी (दि. २९) रोजी दुपारी रोटरी क्लब ऑफ करकंब तर्फे चंद्रभागा हॉस्पिटल करकंब येथे मोफत रेग्युलर चेकअप व मधुमेह निदान शिबीर दुपारी 12:00ते 5:00 या वेळेत घेणेत आले

   या शिबिरात करकंब व आसपासच्या परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. हे आरोग्य शिबीर संपन्न करणेसाठी रॊ. डॉ विनोद शिंगटे, रॊ. डॉ. प्रशांतकुमार मोरे, रॊ. डॉ. अक्षयकुमार  मोरे तसेच चंद्रभागा हॉस्पिटलच्या डॉ.  सरस्वती मोरे,  डॉ. धनश्री मोरे,

 रॊ. सुनील अडगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

   शेवटी 'वंदे मातरम ' होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.