Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणी च्या दृष्टीने करकंब येथे सर्वस्तरीय बैठकीत 18002703600 चे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या संपन्न

( यूट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी watch on YouTube वर क्लिक करा.) ग्राम सुरक्षा यंत्रणा चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडे...

( यूट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी watch on YouTube वर क्लिक करा.)

ग्राम सुरक्षा यंत्रणा

चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद.

जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित.

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम


मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या प्रयत्नातून , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम आजचे सूचनेप्रमाणे जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील 27 गावांमधील सर्व पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून नागरिकाची उपस्थिती राहिली.


पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. तसेच श्री उत्तम सुतार ग्राम सुरक्षा यंत्रणा जिल्हाप्रमुख व श्री विक्रमसिंह घाटगे ग्रामसुरक्षा अधिकारी यांनीही सदरच्या प्रात्यक्षिक दाखविणे ॲप इन्स्टॉल करणे फार्म भरून घेणे असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास सर्व 27 गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच ,माजी उपसरपंच ,विविध राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष नेतेमंडळी, सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी , युवा वर्ग व महिला उपस्थित होते. त्यापूर्वी सर्व ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा करिता प्रतिसाद देत सर्व गावांमध्ये सायरन आलट भोंगे बसवण्यात आलेले आहेत याही ग्रामसुरक्षा यंत्रणेला जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केलेले आहे.


सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे तसेच सर्व बीट अमलदार व पोलीस अंमलदार यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच सर्व गावातील पोलीस पाटील यांनी त्यांचे गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करून ग्रामसुरक्षा कार्यक्रमास मोलाचे सहकार्य केले आहे

गेल्या 9 वर्षांत पुणे,नाशिक,सातारा,व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट

घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.

गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरी स्थांना एकाच वेळी कळणे.

अफवांना आळा घालणे.

प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.

पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा

गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत

संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600

यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.

संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.

दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.

नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.

एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.

वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.

घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.

संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.

चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.

गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.

सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.