Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंबच्या सुकन्या कु. अद्वैता महानंदा-मोहन शिंदे यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड

करकंब : कु. अद्वैता महानंदा-मोहन शिंदे यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या सनदी अधिकारी पदावर निवड. करकंबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा करकंबच्या...


करकंब : कु. अद्वैता महानंदा-मोहन शिंदे यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या सनदी अधिकारी पदावर निवड.

करकंबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

करकंबच्या सुकन्या कु. अद्वैता महानंदा-मोहन शिंदे  यांचे करकंब येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये व दहावीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण झाले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील सातारा येथे उच्च शिक्षण होऊन आज त्यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या सनदी अधिकारी पदावर निवड झाली आहे.

त्या M.P.S.C. परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची रेंज ऑफिसर या पदी निवड झाली आहे.

त्यांचे  वडील एसटी मध्ये वाहक असून त्यांचा 'हसरी भेळ' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. 

काही महिन्यांपूर्वी त्यांचा भाऊ चि. पंकज महानंदा-मोहन शिंदे याने नॅशनल बँकिंग परीक्षेत यश मिळवले असून तोही आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे ॲग्रीकल्चर ऑफिसर पदी नियुक्त झाला आहे.

दोन्ही भावंडांच्या निवडीमुळे करकंब व परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.