Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करकंब केंद्रामध्ये शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा संपन्न

करकंब ; मा मुख्यकार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रममुळे प्रत्येक शाळेतमध्ये नव चैतन्याचे वातावरण...



करकंब ; मा मुख्यकार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रममुळे प्रत्येक शाळेतमध्ये नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरू पाहत आहे.

हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवकल्पना, योजना शोधण्यासाठी व शिक्षकांच्या विचारांना पूर्ण चालना देण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.केंद्रस्तरीय  निबंध स्पर्धेचे आयोजन केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी यांनी केले होते.



 निबंध स्पर्धेचे उद्दिष्टे

1. जिल्हा परिषद शाळांची दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे.

2. कोव्हिड काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे.

3.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वोतोपरी उपाय शोधणे.

4. शिक्षक , मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख एकत्र येऊन गुणवत्ते साठी विचार मंथन करणे

निबंध स्पर्धा विषय

शिक्षकांसाठी

माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी जबाबदारी

या विषयावर जिल्हा परिषद शाळेतील 29 शिक्षकांनी भाग घेतला व उत्कृष्ट लेखन केले.


निबंध लेखन स्पर्धेचे क्रमांक खालील प्रमाणे 

1. श्रीम ज्योती ज्ञानेश्वर माने शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती नं 2 करकंब 

2. श्री सिद्धेश्वर मुरलीधर लेंगरे शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नं 2 करकंब

3. श्रीम रेखा शंकर कांबळे शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नं 1 करकंब

उत्तेजनार्थ

श्रीम. देवकी शंकरराव कलढोणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नं 1 करकंब

यांनी निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केले.

शिक्षक निबंध लेखन स्पर्धा

आज दिनांक 02 ऑक्टोबर 2021 रोजी परिपत्रक नुसार स्थळ रामभाऊ जोशी हायस्कुल करकंब येथे करण्यात आले. स्पर्धा सकाळी 11:30 वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. व 12 वाजता निबंध लेखन स्पर्धा चालू झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष  महारुद्र नाळे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पंढरपूर हे होते तर दत्तात्रय खंदारे, शेखर कोरके यावेळी उपस्थित होते.  केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी यांनी स्पर्धेचे नियम सांगून प्रस्तावना केली तसेच परीक्षक म्हणून 1)श्री संजय सांगोलकर सर आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज करकंब व 2) चव्हाण सर, न्यू इंग्लिश स्कुल करकंब यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लेंगरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. नकाते सर यानी केले. या वेळी स्पर्धेचे केंद्रास्तरीय आयोजक आप्पासाहेब माळी, केंद्रप्रमुख करकंब यांनी काम पाहिले.

ADVERTISE