Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, करकंब दर्शन न्युज पोर्टल आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन गौरी आरास स्पर्धा 2021 चा निकाल जाहीर

 साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, करकंब दर्शन न्यूज पोर्टल आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन गौरी आरास स्पर्धा 2021 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला...


 साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, करकंब दर्शन न्यूज पोर्टल आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन गौरी आरास स्पर्धा 2021 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 

 साप्ताहिक करकंब दर्शन चे संपादक सागर थिटे व सहसंपादक सौ. सरीता थिटे यांनी हा निकाल जाहीर केला.

ऑनलाईन गौरी आरास स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. विशेष म्हणजे ह्या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी घेतली जात नाही. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ५८ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

परीक्षक म्हणून सौ.राजश्री कुंटे, पुणे, श्री. लक्ष्मण जाधव, करकंब व सौ. रुपाली थिटे, कुर्डुवाडी यांनी काम पाहिले तर दर्शक कमेंट मोजण्याचे काम कु. अनुष्का थिटे यांनी केले.

खरे तर दर्शक पसंती व परीक्षक गुण असे एकत्रित गुणांवर निकाल जाहीर केला जाणार होता परंतु प्रत्येक स्पर्धकाला न्याय मिळावा ह्या हेतूने स्पर्धा समितीने दोन्ही निकाल वेगवेगळे जाहीर करण्याचा निर्णय घेतला तसेच या व्यतिरिक्त ३ स्पर्धकांची विशेष पुरस्कारासाठी निवड  उपसंपादक आकाश थिटे आणि अनुष्का थिटे यांनी केली.

परीक्षक पसंती ७ , दर्शक पसंतीचे ५ व विशेष पारितोषिकाचे ३ असे एकूण १५ पारितोषिकांची घोषणा करण्यात आली.

यथावकाश या स्पर्धेचे पारितोषिक वितरण एका समारंभात केले जाणार असून दूरच्या विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमास येणे शक्य नसल्यास त्यांना समारंभानंतर त्यांचे पारितोषिक पोहोच केले जाईल असेही या वेळी सांगण्यात आले.  

विजेत्या स्पर्धकांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहे.

दसरा- दिवाळी दरम्यान ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे यावेळी अनुष्का थिटे यांनी सांगितले.

स्पर्धेचा निकाल

परीक्षक पसंती

प्रथम क्रमांक : सविता किशोर महामुनी, रोपळे ता.पंढरपूर

द्वितीय क्रमांक : सुरभी गायकवाड, आहेसोमेश्वर ता. बारामती

तृतीय क्रमांक : मीनाक्षी विशाल रेपाळ, करकंब ता. पंढरपूर

चतुर्थ क्रमांक (विभागून) : मनीषा मारुती गायकवाड, पेहे ता. पंढरपूर

चतुर्थ क्रमांक (विभागून) : छाया प्रशांतकुमार मोरे, करकंब ता. पंढरपूर

पाचवा क्रमांक (विभागून) : गौरी आनंद महामुनी, मोडनिंब ता. माढा

पाचवा क्रमांक (विभागून) : शितल लक्ष्मण चव्हाण, करकंब ता. पंढरपूर

दर्शक पसंती

प्रथम क्रमांक : दिपाली संदीप बर्गे, थेरगाव, पुणे

द्वितीय क्रमांक : मोहिनी सागर इंगोले, कासेगाव ता. पंढरपूर

तृतीय क्रमांक : विद्या हनुमंत ढवारे,धायरी, पुणे

चतुर्थ क्रमांक : शमा संजय जाधव, मुलुंड (पू), मुंबई

पाचवा क्रमांक : अर्चना ज्ञानेश्वर भगत, पिंपरद ता. फलटण

विशेष पारितोषिक

कोमल नारायण भोईटे, सणसर ता. फलटण

जयश्री धनंजय इदाते करकंब ता. पंढरपूर

समृद्धी मंगेश चव्हाण, पंढरपूर

सर्व स्पर्धकांचे व परीक्षकांचे आभार, धन्यवाद !

यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन व शुभेच्छा !