Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

तोतया पोलीस करकंब पोलिसांच्या ताब्यात

  करकंब :           करकंब ते नेमतवाडी रोडवर एक तोतया पोलीस वहाने आडवून वसुली करत असल्याचे करकंब पोलिसांना समजताच त्यास पाठलाग करुन शिताफीने ... करकंब :

        करकंब ते नेमतवाडी रोडवर एक तोतया पोलीस वहाने आडवून वसुली करत असल्याचे करकंब पोलिसांना समजताच त्यास पाठलाग करुन शिताफीने पकडण्यात आले. 

        याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २५ रोजी एक इसम करकंब-नेमतवाडी रोडवर मी पोलीस असल्याने सांगत येणाऱ्या जाणाऱ्या कडून वसुली करता होता. त्याच्या जवळ असणा-या मोटरसायकल क्र. (एम. एच. ४५ ए. एन. २५८१) वर पोलीस असे लिहिलेले होते. कोणाला मास्क, हेल्मेट याबाबत तसेच लायसेन्स मागून, नसल्यास दंड वसुली करता होता. असे चालू असताना शंका आल्याने गणेश व्यवहारे यांनी करकंब पोलीस स्टेशनला फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यावेळी करकंब पोलीस स्टेशनचे हवालदार गोरवे, घोळवे, जाधव व मोरे यांनी तात्काळ खाजगी वहानाने रवाना झाले.

          तो पर्यंत तो तेथून नेमतवाडी कडे पळून गेल्याचे तेथे उपस्थित असणारे गणेश व्यवहारे, लक्ष्मण खारे, शरद खारे, बंडू वंजारी व विजय देशमुख यांनी सांगितले. 
           
        यावर करकंब पोलिसांनी लगेच नेमतवाडी, पेहे, नांदुरे या गावांतील पोलीस पाटलांना संपर्क साधून सावध केले. त्यानंतर तेथील लोकांनी रस्त्यावर गाड्या लावून त्या इसमाला आडविण्याचा प्रयत्न केला. 
          
        त्या तोतया पोलीसाने बैलगाडी रस्त्याने आत जावून तेथेच गाडी सोडून गाडीची चावी घेऊन उसाच्या पीकात पळून गेला. त्याला बराच वेळ तेथील नागरीक व पोलीसांनी शोध घेतल्यानंतर त्यास शिताफीने ताब्यात घेतले. 
        
         त्या इसमाचे नाव प्रशांत अनिल वाघ (वय २८) रा. वेताळवाडी, ता. माढा असे असून त्याच्यावर करकंब पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 
        
        सदरची कारवाई करकंब पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश तारु यांच्या अधिपत्याखाली पो.उप. नि. महेश मुंडे, अजित मोरे यांच्या सूचनेनुसार पो. ना. इनामदार तपास करीत आहेत. यासाठी पो. ह.गोरवे, घोळवे, जाधव व मोरे यांनी विशेष कामगिरी केली.