Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे ऑफलाईन शिक्षण परिषद कार्यशाळा संपन्न

  करकंब दि.24सप्टेंबर  करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर येथे शालेय शिक्षण विभाग सोलापूर यांच्या वतीने आयोजित केंद्र करकंब ब...


 
करकंब दि.24सप्टेंबर 

करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर येथे शालेय शिक्षण विभाग सोलापूर यांच्या वतीने आयोजित केंद्र करकंब बिटस्तर "शिक्षण परिषद" कार्यशाळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उदघाटन मुख्याध्यापक हेमंत कदम,करकंब केंद्रप्रमुख अप्पासाहेब माळी,मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे,शंकर गायकवाड, संजय सांगोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल हेमंत कदम सर यांचा सत्कार करून कार्यशाळेचे सुरूवात करण्यात आले.

 या कार्यशाळेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे एम.के.पुजारी यांनी इयत्ता पाचवी भाषा विषयाचे अध्ययन निष्पत्ती व एन.ए.एस.अनुषंगाने मार्गदर्शन केले. न्यू.इग्लिश स्कूलचे गायकवाड सर यांनी गणित विषयाचे अध्ययन निष्पत्ती,आणि आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चे सौ.आरती कांबळे(मॅडम) यांनी परीसर अभ्यास या विषयासाठीचे अध्ययन निष्पत्ती या विषयी मार्गदर्शन केले.

शाळेची गुणवत्ता वाढीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम राबवलेल्या करकंब केंद्रातील उपक्रमशील शिक्षक श्री.शेखर कोरके,जुजगार सर,संजय सांगोलकर,श्रीम. माने मॅडम,श्रीम. बोत्रे मॅडम,दत्तात्रय खंदारे सर यांनी माहिती सांगीतली.


     केंद्रप्रमुख अप्पासाहेब माळी यांनी गुणवत्ता पूर्ण शाळा तयार करण्यासाठी विविध स्वाध्यायाचे माहीती व मार्गदर्शन केले.