Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे आदिवासी समाजाचा मेळावा संपन्न ; पाेलीस, ग्रामपंचायत प्रशासन, महा ई सेवा केंद्राच्या वतीने पारधी समाजाचे प्रबाोधन

  करकंब            जननायक शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस, महा-ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्रित बैठक घेऊन...


 करकंब 

        जननायक शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस, महा-ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्रित बैठक घेऊन पारधी समाजाचे प्रबोधन केले.

        यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्याचा आपल्या व समाजाच्या परिवर्तनासाठी उपयोग करुन घ्या. चांगले, प्रतिष्ठित, समाजमान्य उद्योग, व्यवसाय सुरु करा. तसेच मुलांना चांगले शिक्षण द्या.स्वतःसह समाजाला प्रवाहात आणा असे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी यावेळी बोलताना केले..
        पीएसआय अजित मोरे यांनी पारधी समाजाशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले.


        ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पारधी समाजासाठी व्यवसायासाठी गाळे, घरकुले देण्यासाठी नक्कीचं प्रयत्न करु असे मत माजी ग्रा.पं. सदस्य व समाजसेवक सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.

       यावेळी पारधी समाजातील बंधू- भगिनींनी त्यांच्या भावना व्यक्त करीत समस्या मांडल्या. समाजाच्या प्रवाहात येत
 असतानाच्या अडचणी कथन केल्या. शासकीय जमीन, राहण्यास घर मिळावे अशा मागण्या महिलांनी केल्या.
        पारधी समाजाचे अध्यक्ष भारत काळे यांनी स्व. आर. आर. पाटील यांची आठवण काढत आबांनी समाजाबद्दल केलेल्या
 कार्याचे स्मरण केले. आजपर्यंत आबांनी आमच्या समाजाला केंव्हाच प्रवाहात आणले असते. आम्हाला शासनाने सहकार्य करावे,
 समाजबांधवाना शासकीय  सेवेत घ्यावे तरच आमचा समाज वंचित रहाणार नाही अशी भावना व्यक्त केली.


                                               

         प्रास्ताविकात प्रा. सतिश देशमुख यांनी आम्ही या समाजाच्या पाठीशी असून ह्या समाजाला प्रवाहात 
आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्हावी दिली.पारधी समाजातील युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
        करकंब महा-ई सेवा केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना , प्रमाणपत्र, कागदपत्रे यांसाठी माफक
 दरात सेवा सुविधा देऊ असे मत यावेळी पत्रकार व संचालक गोपीनाथ देशमुख,  अतुल अभंगराव यांनी आश्वासन दिले.

                                       

     या कार्यक्रमाला प्रा. सतिश देशमुख,सचिन शिंदे,  महेबूब बागवान, सावता खारे, रमेश  फुगे, कैलास हरीहर,
 पप्पू काळे, अजय काळे, बचत गटाचे फायनान्स शिंदे साहेब, विठ्ठल काळे, विश्वनाथ केमकर, लक्ष्मण शिंदे, 
अतुल अभंगराव, गोपीनाथ देशमुख, भारत काळे इ. उपस्थित होते.


Attachments area