Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पुरोगामी प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न

पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा   संस्थेच्या कार्यकाळातील पहिलीच ऑनलाईन सभा उत्तमरीत्या पार पडली. पुरोगामी...

पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
 संस्थेच्या कार्यकाळातील पहिलीच ऑनलाईन सभा उत्तमरीत्या पार पडली.


पुरोगामी प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेची सन 2019-20 ची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा शिक्षक सोसायटी सभागृह, पंढरपूर येथे संस्थेचे चेअरमन श्री.राजेंद्र खपाले यांचे अध्यक्षेतेखाली व्हा.चेअरमन श्री.संतोष थोरात, सचिव श्री.एकनाथ कुंभार  व सर्व संचालक मंडळ  यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच संस्थेचे मार्गदर्शक, संस्थापक शिक्षक समितीचे नेते बाळासाहेब ननवरे, कल्याण शिंदे , उपाध्यक्ष सुनिल अडगळे, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे, नूतन मुख्याध्यापक सुखदेव खांडेकर ,मा.चेअरमन आवेश करकमकर यांचे प्रमुख उपस्थितीत पहिलीच ऑनलाईन सर्वसाधारण सभा उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली.


यावेळी 10 वी व 12 वी च्या शिक्षक सभासदांच्या गुणानुक्रमे प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन शरद गावडे यांनी केले तर आभार दत्तात्रय खंदारे यांनी मानले.