Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री.प्रभाकर रसाळ (सेवानिवृत्त, इंजिनिअर पाटबंधारे विभाग) करकंब यांच्याकडून रामभाऊ जोशी प्रशालेस 100000(एक लाख रू. कायम ठेव धनादेश भेट)

  करकंब: करकंब येथील उच्चविद्याभूषित कुटूंब व रामभाऊ जोशी हायस्कूलचे माझी विद्यार्थी श्री.प्रभाकर रसाळ साहेब(सेवानिवृत्त इंजिनियर),माझी विद्...

 


करकंब: करकंब येथील उच्चविद्याभूषित कुटूंब व रामभाऊ जोशी हायस्कूलचे माझी विद्यार्थी श्री.प्रभाकर रसाळ साहेब(सेवानिवृत्त इंजिनियर),माझी विद्यार्थीनी सौ.प्रभांजली प्रभाकर रसाळ ,माझी विद्यार्थी श्री. प्रभाकांत प्रभाकर रसाळ (सॉफ्टवेअर इंजिनिअर- अमेरीका) यांच्या कडून आज रामभाऊ जोशी प्रशालेस 100000(एक लाख रू) चा धनादेश दयानंद काॅलेज सोलापूरचे प्राचार्य श्री.ऊबाळे सर,दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.क्षिरसागर सर,श्री.मुळीक सर,श्री.बिराजदार सर,मुख्याध्यापक श्री.हेमंत कदम,पर्यवेक्षक श्री.धनवंत करळे यांच्याकडे आज देण्यात आला.


या धनादेश ठेव व्याज रक्कमेतून दरवर्षी प्रशालेत दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

याबद्दल करकंब येथील दयानंद शिक्षण संकुलातर्फे श्री. रसाळ यांचा सत्कार करण्यात आला.